Interest rates on savings accounts : ‘ह्या’खासगी बँका बचत खात्यावर देतायत एफडीपेक्षाही जास्त व्याजदर; जाणून घ्या फायद्याची गोष्ट

MHLive24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- बँक फिक्स्ड डिपॉझिट भारतातील सर्वाधिक पसंतीची आणि लोकप्रिय ठेव योजना आहे. यात बँक 1 ते 10 वर्षांच्या कालावधीत 5.50 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज दर देतात. एफडी वर मिळणारा व्याज दर या ठेव योजनेची लोकप्रियता ही सुरक्षित स्वरुपाची असते.(Interest rates on savings accounts)

यामध्ये गुंतवणुकीवर निश्चित वेळेत व्याज मिळतो. तसेच गुंतवणूकदारांचे पैसे वाढतच जातात. परंतु अलीकडील काळामध्ये बँकेमधिल व्याजदर कमी झाले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईच्या हिशोबाने हे व्याजदर पुरेशे होत नाहीत.

आता सध्या छोट्या खासगी बँका नवीन किरकोळ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या बँकांपेक्षा बचत खात्यांवर जास्त व्याजदर देत आहेत. एफडी पेक्षाही जास्त व्याजदर या बँकांच्या बचत खात्यावर मिळत आहे. चला जाणून घेऊयात त्यांचे व्याजदर 

Advertisement

इंडसइंड बँक

इंडसइंड बँक बचत खात्यांवर 5 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. बचत खात्यात सरासरी मासिक शिल्लक आवश्यकता 1500 ते 10,000 रुपये आहे.

येस बँक

Advertisement

येस बँक बचत खात्यांवर 5.25 टक्के व्याजदर देत आहे. यामध्ये 10,000 ते 25,000 रुपये मासिक सरासरी शिल्लक राखणे आवश्यक आहे.

बंधन बँक

बंधन बँक बचत खात्यांवर 6 टक्के व्याज देते. बचत खात्यात मासिक सरासरी 5,000 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

Advertisement

आरबीएल बँक

आरबीएल बँक बचत खात्यांवर 6 टक्के व्याज देते, यासाठी खातेधारकांची मासिक सरासरी शिल्लक आवश्यकता 2,500 ते 5,000 रुपये आहे.

डीसीबी बँक

Advertisement

DCB बँक बचत खात्यांवर 6.75 टक्क्यांपर्यंत व्याज देते. ही बँक खासगी बँकांमध्ये सर्वाधिक व्याज देत आहे. यामध्ये 2,500 ते 5,000 रुपये मासिक सरासरी शिल्लक आवश्यक आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker