Insurance Tips marathi : इन्शोरन्स घेतलाय पण विमा कंपनी किंवा ब्रोकर त्रास देतायेत? ‘येथे’ करा तक्रार लगेच मिळेल न्याय

अनेक वेळा आपण आपल्या विमा कंपनी किंवा विमा ब्रोकरवर नाराज असतो. त्यांच्या करतूदीमुळे बऱ्याचदा समस्या निर्माण होतात. परंतु अशा वेळी या संदर्भात तक्रार आपणास करावयाची असते. परंतु ती कोठे अकरावी या संदर्भात  काही कल्पना नसते.

पॉलिसीधारक त्यांच्या विमा कंपनीकडे अनेक गोष्टींबद्दल तक्रार करू शकतात जसे की क्लेम येण्यास उशीर, प्रीमियमवर विवाद, पॉलिसीच्या अटी आणि शर्तींचा चुकीचा अर्थ

इ. तुम्हालाही अशी कोणतीही समस्या असल्यास तुम्ही विमा कंपनी किंवा विमा दलाल यांच्याविरुद्ध विमा लोकपालकडे ऑनलाइन तक्रार करू शकता.

Advertisement

यासाठी वित्त मंत्रालयाने विमा लोकपाल नियम 2017 मध्ये सुधारणा केली आहे. तुम्ही  विमा लोकपालकडे तक्रार कशी करू शकता ते जाणून घेऊयात –

* विमा लोकपाल काय आहे ते जाणून घ्या – पॉलिसीधारकांच्या तक्रारींचे योग्य पद्धतीने निराकरण करण्यासाठी सरकारने विमा लोकपाल सुरू केला होता. देशातील कोणताही पॉलिसीधारक कोणत्याही विमा सेवेवर नाराज असेल आणि त्याच्या समस्यांचे निराकरण होत नसेल, तर तो विमा लोकपालाकडे तक्रार करू शकतो. तुमचीही तुमच्या विमा कंपनीकडे काही तक्रार असल्यास, तुम्ही विमा लोकपालकडे तक्रार करू शकता.

पण त्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. देशात एकूण 17 विमा लोकपाल कार्यालये असल्याने, त्यांची संपूर्ण यादी त्यांच्या https://www.policyholder.gov.in/hindi या वेबसाइटला भेट देऊन पाहता येईल. तुम्ही ज्या भागात तक्रार करू इच्छिता त्या भागातील विमा लोकपालाशी संपर्क साधू शकता. विमा लोकपालाकडे तक्रार करणे पूर्णपणे विनामूल्य आहे.

Advertisement

* ऑनलाइन तक्रार कशी करावी – जर तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या सेवांबद्दल खूश नसाल, तर तुम्ही विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार  टोल फ्री नम्बर 155255 किंवा  1800 4254 732 वर कॉल करू शकता. तसेच तुम्ही  complaints@irda.gov.in  वर ई-मेल पाठवू शकता. तसेच, तुमची विमा लोकपालाकडे तक्रार असल्यास, तुम्ही IRDA च्या वेबसाइटवर दिलेल्या प्रादेशिक कार्यालयांच्या ईमेलवर तक्रार करू शकता.

* तुम्ही ग्राहक मंच किंवा दिवाणी न्यायालयात तक्रार करू शकता – या सर्व पद्धतींनंतरही तुमच्या तक्रारीचे निराकरण होत नसेल, तर तुमच्याकडे ग्राहक मंच किंवा दिवाणी न्यायालयात तक्रार करण्याचा पर्यायही आहे. तुम्ही ग्राहक व्यवहार विभागाकडे तक्रार करू शकता.

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker