साधी इंग्रजीदेखील न येणाऱ्या सामान्य माणसाने उभी केली करोडो रुपयांची ‘पेटीएम’ कंपनी; वाचा प्रेरणादायी सक्सेस स्टोरी

MHLive24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा आज ज्या उंचीवर आहेत तेथे जाण्यासाठी त्यांनी कोणत्या परिस्थितीमधून दिव्य केले हे क्वचितच कुणाला माहित असेल. एखाद्याच्या कमकुवतपणावर मात करून यशस्वी कसे होऊ शकते याचे ते उदाहरण आहे. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते.(Inspirational Success Story of paytm)

या सर्व अडचणी असूनही त्यांनी हिंमत हारली नाही आणि रात्रंदिवस मेहनत करून एक लाख कोटी रुपयांची कंपनी उभी केली. आम्ही तुम्हाला सांगतो की आज विजय शेखर शर्मा पुन्हा अनेक वृत्तपत्रांच्या हेडलाइनमध्ये सध्या आहेत. विजय शेखर शर्मा प्रायव्हेट बँक येस बँकेतील मोठा हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

मात्र ही लोकप्रिय कंपनी सुरू करून यशाच्या शिखरावर पोचणाऱ्या विजय शेखर शर्मा यांनी कहाणी खास आहे. त्यांचे वडील एका शाळेमध्ये शिक्षक होते. त्यानंतर विजय शेखर शर्मा दिल्लीमध्ये आले आणि त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले.

Advertisement

त्यांना इंग्रजी व्यवस्थित येत नव्हती कारण अलीगढ येथे त्यांनी आपले शिक्षण हिंदी माध्यमातून पूर्ण केले होते. यावर मार्ग काढण्यासाठी विजय शेखर शर्मा यांनी मासिके वाचणे आणि आपल्या मित्रांच्या मदतीने इंग्रजी शिकण्यास सुरूवात केली. यावर त्यांनी खूप दिवस मेहनत घेतली. याचा परिणाम असा झाला की त्यांचे इंग्रजी अतिशय उत्तम झाले.

व्यावसायिकतेकडे कल

इंग्रजी सुधारण्याच्या प्रयत्नात विजय शेखर शर्मा वर्गात मागे पडत गेले. एरवी वर्गात पहिले येणारे विजय शर्मा यामुळे इतके वैतागले की त्यांनी कॉलेजमध्ये जाणेच बंद केले. कॉलेज न गेल्यामुळे हाती आलेल्या वेळेचा उपयोग त्यांनी व्यावसायिकतेचे कौशल्य मिळवण्यासाठी केला. त्यांना अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात जायचे होते.

Advertisement

मात्र इंग्रजीचे आव्हान आणि आर्थिक ताकदीचा अभाव यामुळे ते जाऊ शकले नाहीत. ते कोडिंग स्वत:च शिकले. आपल्या कॉलेजच्या मित्रांबरोबर त्यांनी कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम बनवली. या सिस्टमचा वापर काही मोठी न्यूज पब्लिकेशनने सुरू केला.

यावेळेस विजय शेखर शर्मा यांनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरूवातीला एका मल्टीनॅशनल कंपनीत आपली पहिली नोकरी सुरू केली. त्यानंतर सहा महिन्यातच ही नोकरी सोडत त्यांनी मित्रांबरोबर स्वत:चीच कंपनी सुरू केली.

पेटीएमची सुरूवात

Advertisement

मात्र इथे त्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. ज्या मित्रांबरोबर त्यांनी व्यवसाय सुरू केला होता त्यांना दिवाळखोरीच्या स्थितीत विजय शर्मा यांची साथ सोडली. मात्र शर्मा यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. शर्मा यांनी २००० मध्ये पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या One97 ची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी इंटरनेटच्या दुनियेतील तीन मूलभूत गोष्टींवर म्हणजे कंटेंट, जाहिरात आणि व्यापार या तीन बाबींवर मेहनत घेतली.

२०१० मध्ये पहिल्यांदा त्यांनी पेमेंट इकोसिस्टमची कल्पना आणली. कंपनीची मॅनेजमेंट त्यासाठी तयार नव्हती. यावर शर्मा यांनी आपल्या हिश्यातील एक टक्का रक्कम म्हणजे १५ कोटी रुपये यासाठी खर्च करण्याचा प्रस्ताव दिला. हे २०११चे साल होते. या नव्या संकल्पनेची जबाबदारी आणि खर्चाचा भार शर्मा यांच्यावर होता.

मात्र त्यांनी आत्मविश्वासाने Paytm म्हणजेच Pay Through Mobile या अॅपची सुरूवात केली. येथूनच त्यांच्या आयुष्याला आणि देशाच्या डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या क्षेत्राना नवे वळण मिळाले आणि पुढे इतिहास घडला. आज हे क्षेत्र भरभराटीला आले असून पेटीएमचे मॉडेल या क्षेत्रातील प्रत्येक कंपनीसाठी महत्त्वाचे ठरले आहे.

Advertisement

पेटीएम आयपीओचा कालावधी

समोर आलेल्या माहितीनुसार पेटीएमची मुख्य प्रवर्तक कंपनी One97 Communications Ltd चा हा आयपीओ असणार आहे. हा आयपीओ ८ नोव्हेंबर खुला होणार आहे. तर १० नोव्हेंबर ही त्याची अंतिम तारीख आहे. म्हणजेच सर्वसामान्य गुंतवणुकदारांना यामध्ये ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान गुंतवणूक करता येणार आहे. शेअर बाजारात पेटीएमची लिस्टिंग १८ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker