Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

महागाई कंबरडे मोडवणार! CNG, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरांत मोठी वाढ; पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ

0 0

MHLive24 टीम, 14 जुलै 2021 :- देशात महागाई प्रचंड वाढली आहे. देशात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गॅस सिलिंडरचे दरही वाढले आहेत. या सर्वांचा परिणाम महागाईचा भडका झाला आहे.

आता यातच भर म्हणून कि काय मध्यरात्रीपासून सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅस (PNG)च्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

सीएनजीच्या दरात किलोमागे किती वाढ ? :- महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 2.58 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 55 पैशांची वाढ केली आहे. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सीएनजीचा दर किती ? :- त्यामुळे आता मुंबई व आसपासच्या परिसरात सीएनजी 51 रुपये 98 पैसे प्रति किलो तर पीएनजी स्लॅब 1 मध्ये 30.40 रुपये व स्लॅब 2 मध्ये 36 रुपये या दराने उपलब्ध होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या वाढत्या किंमतींमागे प्रवास खर्च आणि दुसऱ्या खर्चांचा देखील समावेश आहे.

Advertisement

महागाईने जनता त्रस्त :- देशात महागाई प्रचंड वाढली आहे. देशात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. याच परिणाम पायाभूत गोष्टी महाग होण्यावर होतो. त्यामुळे आता वाढती महागाई जनतेवर ताण बनत चालली आहे. यामुळे आता जनतेमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement