Inflation increase in Europe : भारतातच नव्हे तर अमेरिकेपाठोपाठ युरोपमध्येही महागाई उच्च स्तरावर; 24 वर्षांचा विक्रम मोडला, जाणून घ्या काय नेमके काय सुरु आहे

MHLive24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- सध्या भारतामधील नागरिक महागाईने त्रस्त आहेत. परंतु सध्या केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग महागाईमुळे त्रस्त झाले आहे. युरोपमधील महागाईने 24 वर्षांचा विक्रम मोडला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे युरोपीय देशांतील महागाईने नोव्हेंबरमध्ये उच्चांक गाठला होता.(Inflation increase in Europe)

या देशांतील महागाई 1997 नंतर नोव्हेंबरमध्ये सर्वात वेगाने वाढली. युरो वापरणाऱ्या 19 देशांमध्ये नोव्हेंबरमध्ये वार्षिक चलनवाढ 4.9टक्क्यांवर पोहोचली. यामध्ये युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जर्मनी, तसेच फ्रान्स, इटली आणि स्पेन यांचा समावेश आहे.

युरोपियन युनियनच्या स्टेटिस्टिक्स ऑफिस Eurostat च्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. युरोपियन युनियनने 1 जानेवारी 1999 रोजी युरोपला चलन म्हणून स्वीकारले.

Advertisement

त्याच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे 1997 मध्ये महागाईचे आकडे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विक्रमी पातळी गाठली आहे. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण 4.1 टक्के होते.

महागाई का वाढत आहे ?

युरोस्टॅटच्या अंदाजानुसार, नोव्हेंबरमध्ये तेलाच्या किमती 27.4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या कालावधीत सेवा महागाई 2.7 टक्क्यांनी वाढली आहे.

Advertisement

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्समधील अर्थशास्त्रज्ञ कॅथरीना कोएन्झ यांनी एका संशोधन नोटमध्ये लिहिले आहे की महागाई वाढण्याचे मुख्य कारण तेलाच्या उच्च किंमती हे आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूळ महागाई देखील वाढली आहे. हे जर्मन पॅकेज हॉलिडे प्राइजेज वाढल्यामुळे असू शकते.

एक दिवस आधी, युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनीने नोव्हेंबरमध्ये कंज्यूमर प्राइस मध्ये 5.2 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच सप्टेंबरमध्ये जर्मनीतील महागाई 4 टक्क्यांवर पोहोचली. अमेरिकेतही तेल आणि इतर वस्तूंच्या वाढीमुळे नोव्हेंबरमध्ये ग्राहकांच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. 31 वर्षांतील ही सर्वाधिक वार्षिक वाढ आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker