महागाईचा भडका; आज गॅसच्या किमती ‘इतक्या’ रुपयांनी पुन्हा वाढल्या

Mhlive24 टीम, 01 मार्च 2021:– केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पुन्हा एकदा घरगुती वापराचा गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ केली. या दरवाढीने सिलिंडरची किंमत 800 रुपयांवर गेली आहे. याआधी गेल्या आठवड्यात गुरुवारी सिलिंडर 25 रुपयांनी महागला होता.
एलपीजी सिलेंडरचे 25 रुपयांनी वाढल्या किमती
एक मार्चची सुरवात धक्क्याने झाली, गॅससिलिंडरच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 3 वेळा वाढ झाली होती, केवळ फेब्रुवारीमध्ये सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाला आहे, आज या वाढीने अवघ्या 26 दिवसांत एलपीजीला 125 रुपयांनी महाग केले आहे.
आता मुंबईत 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरच्या खरेदीसाठी ग्राहकांना आता 819 मोजावे लागती.सध्या 14.2 किलोचा (अनुदानीत) गॅस सिलिंडरची किंमत 794 रुपये आहे. त्यात आजपासून 25 रुपयांची वाढ होणार आहे.
फेब्रुवारीत तीनवेळा महाग झाला सिलिंडर
फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत 3 वेळा वाढ करण्यात आली आहे. सरकारने 4 फेब्रुवारीला एलपीजीच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर, 15 फेब्रुवारीला सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली. आणि 25 फेब्रुवारीला पुन्हा 25 रुपयांची वाढ झाली.
कोरोना महामारीनंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडरचे दर वाढले. आणि आज पुन्हा दर वाढल्याने गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे.