Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

‘गाय छाप’ वर आयकर विभागाचा छापा ! तब्बल 335 कोटी रूपयांचे बेहिशेबी व्यवहार…

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:गेल्या ७० वर्षांपासून राज्यातील तंबाखू व्यवसायातील प्रसिद्ध नाव असलेल्या ‘गाय छाप’ तंबाखूच्या म्हणजेच मालपाणी उद्योग समूहाच्या मुख्य कार्यालयासह तब्बल 34 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

Advertisement

राज्यातील तब्बल 34 ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत 335 कोटी रूपयांचे बेहिशेबी व्यवहार आढळून आले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील 34 ठिकाणच्या विविध कार्यालयांवर शोध मोहीम आणि जप्तीची कारवाई केली.

Advertisement

संगमनेर, पुणे व पाथर्डी यासह राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या 34 कार्यालयांवर आयकर विभागाने एकाच वेळी छापा सत्र केले. जवळपास तीन दिवस चाललेल्या या कारवाईत आयकर विभागाच्या अनेक टीम सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयकर विभागाच्या औरंगाबाद टीमने कारवाई करताना जवळपास 243 कोटी रुपयांची बेहिशेबी तंबाखू विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. हस्तलिखित व एक्सेल शीटमधील तपासात ही माहिती समोर आली आहे.

Advertisement

याशिवाय बांधकाम क्षेत्रात सुद्धा अशाच पद्धतीने 40 कोटींच्या हिशोबाची अनियमितता आढळून आली आहे. प्राथमिक स्वरूपातील ही माहिती असून याबाबत औरंगाबाद अथवा आयकर विभागाच्या ऑफिसमधून निश्चित माहिती मिळालेली नाही.

Advertisement

कोरोना काळात 1 कोटींची मदत :- मालपाणी उद्योग समूहाच्या वतीनं कोरोना काळात 50 लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर 50 लाख पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्यात आले आहेत. याशिवाय 25 लाख रुपये कोरोना काळात स्थानिक ग्रामीण रुग्णालय व विविध संस्थांना देण्यात आले आहेत.

Advertisement

मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने तंबाखू व्यवसायाव्यतिरिक्त शिर्डी येथे वॉटर पार्क व लोणावळा येथे वॉटर पार्क व अमेजॉन पार्क उभारण्यात आला आहे. तर पुणे आणि नाशिकमध्ये रियल इस्टेट व्यवसायातही मोठे प्रोजेक्ट्स सध्या सुरू आहेत.

Advertisement

राम मंदिरालाही दिली होती देणगी :- मालपाणी परिवारातर्फे अयोद्धेतील राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी नुकतीच देण्यात आली होती. राम मंदीर समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राम मंदीर निमार्णार्थ प्रेरणा सभा आणि गोविंददेव गिरी यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

त्यावेळी हा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उद्योजक आणि गीता परिवाराचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांच्यासह मालपाणी परिवारातील इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.गोविंददेव गिरी यांची संगमनेर ही कर्मभूमी आहे. त्यांची समितीवर निवड झाल्यानिमित्त हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याबाबत मोठी जाहिरात ही करण्यात आली होती.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement