Take a fresh look at your lifestyle.

पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना 60 कोटी डोस दिले जाणार

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :- देशात कोरोनाचे संकट कायम आहे. एकीकडे दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्यामध्ये देखील चांगलीच वाढ होत आहे. यातच कोरोना लस बाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.

Advertisement

कोरोना महामारीच्या आकडेवारीत टॉप 3 मध्ये असलेल्या भारत देशातील नागरिकांसाठी एक खुशखबर आली आहे. भारतीयांना कोरोनाची लस देण्याच्या संदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार असून

Advertisement

प्राधान्यक्रम काय असायला हवा याची यादी आता तयार केली जात असल्याचे वृत्त आहे. प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेल्या कोणत्या क्षेत्रात किती कर्मचारी आहेत याची आकडेमोड करण्यात आली आहे. त्यानुसार या टप्प्यातील लसीकरणासाठी 60 कोटी डोसची आवश्‍यकता भासणार आहे.

Advertisement

तसेच लस ठेवण्याची व्यवस्था, वाहतूक, तापमान आदी बाबींच्या अनुशंगानेही नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रसाराचा जास्त धोका असलेल्या भागासह आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी पोलीस यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Advertisement

भारतात सध्या तीन लस चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यावर आहे. यात ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाची लस सर्वात शेवटच्या म्हणजे तिसर्‍या फेजमध्ये आहे. भारतात या लसीचे उत्पादन करणारी सिरम इन्स्टियूट या लसीची मानवी चाचणी करत आहे.

Advertisement

नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात फेज तीनचा डाटा उपलब्ध होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement

लस व्यवस्थापनासाठी बनवण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञांच्या समितीने अमलबजावणीच्या योजनेचा आराखडा तयार केला आहे. केंद्रीय संस्था आणि राज्यांकडून इनपुटस घेऊन त्यावर काम सुरु आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li