Share Market : जबरदस्त शेअर ! अवघ्या काही महिन्यांत एक लाखांचे झाले 17 लाख

MHLive24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- आपल्याकडे ‘जब भगवान देता है तो छप्पर फाड़कर देता है’ अशी एक म्हण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या काही गुंतवणूकदारांसाठी ही म्हण अगदी चपखल बसते.(Share Market)

शेअर बाजार यंदा नवनवीन विक्रम करत असून गुंतवणूकदारांची चांदी होत आहे. काही कंपन्यांच्या शेअरने इतका परतावा दिलाय की लोक करोडपती झालेत.

ह्या शेअर्सने 1700 टक्के परतावा दिला

Advertisement

मिड-कॅप आयटी कंपनीच्या स्टॉकने गेल्या दीड वर्षांत गुंतवणूकदारांना 1500 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. मास्टेक लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. 27 मार्च 2020 रोजी हा शेअर 172.35 वर बंद झाला होता. मंगळवार, 16 नोव्हेंबर रोजी हा शेअर 2932 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अशाप्रकारे, या स्टॉकने गेल्या 19 महिन्यांतच सुमारे 1700 टक्के परतावा दिला आहे.

200 टक्क्यांहून अधिक झेप

जानेवारी 2021 पासून मास्टेक लिमिटेडच्या स्टॉकने 200 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. अशा परिस्थितीत 19 महिन्यांपूर्वी एखाद्याने मास्टेक लिमिटेडमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला 580 शेअर्स मिळाले असते, ही गुंतवणूक आता 17 लाख रुपयांच्या जवळपास वाढली असती.

Advertisement

3,666 रुपयांचा उच्चांक गाठला

जर तुम्ही देखील या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तरत्याविषयी अधिक जाणून घ्या. जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 72.29 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, एप्रिल-जून तिमाहीत हा नफा 69.30 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीच्या निकालापूर्वी, मास्टेकच्या समभागाने 3,666 रुपयांचा उच्चांक गाठला. गुंतवणूकदारांच्या अपेक्षेनुसार निकाल न आल्याने नंतर त्यात सुधारणा करण्यात आली.

डिस्कलेमर : कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker