Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी; उद्या ‘या’ ठिकाणी बससेवा बंद राहणार

Mhlive24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-  कृषी विधयेक कायद्यावरून देशभरात वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्राकडून जाचक कायदे रद्द न केल्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन उभारले आहे.

Advertisement

या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी उद्या 08 डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. यामुळे अनेक गोष्टींवर याचा परिणाम होणार आहे. अशातच एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. उद्याच्या भारत बंद च्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार आहे.

Advertisement

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याचे आदेश एसटीच्या सर्व आगारांना प्रशासनाने दिले आहेत. हे निर्देश एसटीच्या राज्यातील सर्व विभागांना आगारांना देण्यात आले आहेत.

Advertisement

एसटी च्या स्थानिक प्रशासनानं तशी माहिती घेऊन त्या- त्या मार्गावरची वाहतूक सुरू ठेवायची की नाही याबाबत आढावा घेऊन निर्णय घ्यावयाचा आहे. यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही निर्देश आहेत.

Advertisement

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे.या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या संपात नवी मुंबईची एपीएमसी बाजारपेठ सहभागी होणार असून,

Advertisement

त्या दिवशी संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई एपीएमसी मधील पाचही मार्केट बंद करतच राज्यातील नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूर मधील बाजार समित्याही उद्याच्या बंद मध्ये सहभागी होणार आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li