Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

महत्वाची बातमी: आयपीओ येण्याआधीच पेटीएममध्ये मोठा गोंधळ; झाली मोठी उलथापालथ

0 1

MHLive24 टीम, 10 जुलै 2021 :- देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएममध्ये 2.3 अब्ज डॉलर्सच्या आयपीओ येण्याआधीच मोठा गदारोळ सुरू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या नोएडास्थित कंपनीचे अध्यक्ष अमित नय्यर यांच्यासह अनेक उच्च अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यात कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर रोहित ठाकुर यांचाही समावेश आहे. कंपनीचा बहुप्रतिक्षित आयपीओ दिवाळीच्या आसपास येण्याची शक्यता आहे.

Goldman Sachs येथे काम केलेले नय्यर 2019 मध्ये पेटीएम बोर्डामध्ये दाखल झाले. या स्टार्टअप कंपनीची आर्थिक सेवा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. कंपनीच्या विमा आणि कर्जे उभा करण्यासाठी नय्यर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सूत्रांनी सांगितले की नय्यर पेटीएम आयपीओ येण्याआधीच पद सोडणार आहेत. आता फक्त मधुर देवड़ा यांजवळच कंपनीचे अध्यक्ष पद आहे.

Advertisement

पेटीएम काय म्हणाले ? :- रोहित ठाकूर डिसेंबर 2019 मध्ये पेटीएममध्ये सामील झाले. जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याने कंपनी सोडली. काही वरिष्ठ अधिका-यांनी पद सोडल्यानंतर नय्यर आणि ठाकूर यांना कंपनीत आणले होते. ईटीला दिलेल्या ईमेलमध्ये कंपनीने म्हटले आहे की, “आम्ही वैयक्तिक बदलांवर भाष्य करीत नाही. आम्ही एक मजबूत मैनेजमेंट टीम बनवली आहे जे पेटीएमला नवीन उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहेत.

ठाकूर पूर्वी Accenture मध्ये एचआर हेड होते. मायक्रोसॉफ्ट आणि जीई येथेही त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. दुसर्‍या सूत्रने सांगितले की आत्तापर्यंत पेटीएममध्ये कोणालाही बदलण्यात आले नाही. “रोहित कंपनीत नवीन होते.

Advertisement

पेटीएमसारख्या मोठ्या कंपनीचे एचआर व्यवस्थापित करणे, विशेषत: आयपीओच्या आधी, हे एक आव्हानात्मक असू शकते. सूत्रानुसार पेटीएमच्या तीन उपाध्यक्षांनीही कंपनी सोडली आहे. तथापि, ईटीला स्वतंत्रपणे या अधिकाऱ्यांच्या नावांची पुष्टी करता आली नाही.

बरेच उच्च अधिकारी निघून गेले :- वर्षभरात अनेक वरिष्ठ अधिकारी कंपनी सोडून गेले. यात पेटीएम फर्स्टचे प्रमुख, पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पेटीएम मॉलचे मुख्य वित्तीय अधिकारी यांचा समावेश होता. यानंतर मार्केटींग हेड जसकरण सिंग कपानी हे फेब्रुवारीमध्ये कंपनीतून बाहेर पडले होते. संचालक मंडळाच्या मागील बैठकीत कंपनीने अनेक बदल केले होते.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit