राज्यात ‘या’ औषधांची बेकायदेशीर विक्री

MHLive24 टीम, 21 जुलै 2021 :-  अन्न आणि औषध प्रशासन विभागाने महाराष्ट्रभर गर्भपाताच्या औषधांविरोधात धडक कारवाई केली. राज्यात कायद्याची पायमल्ली करत अनधिकृतरित्या गर्भपाताची औषधं विकली जात आहेत. या कारवाईत मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती आणि इतर ठिकाणी मिळून 14 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

13 किरकोळ औषध विक्रेत्यांवर कारवाई :- किरकोळ विक्रेत्यांकडूनही गर्भपाताची औषधं अवैधरित्या मिळत असल्याचं उघड झालं. काही ठिकाणी जास्त पैसे घेऊन तर अनेक ठिकाणी डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय, विनापरवाना, विना बिल गर्भपाताच्या औषधांची विक्री सुरू असल्याचं समोर आलं. एफडीएने केलेल्या या कारवाईत 13 किरकोळ औषध विक्रेत्यांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त करण्यात आलाय.

Advertisement

डाॅक्टरांवर गुन्हे :- अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या कारवाईनंतर पश्चिम उपनगरमध्ये रुग्णालय आणि डॉक्टरांवरही गुन्हा दाखल केला. आरोपी डॉक्टरांनी गर्भपात करण्यासाठी कुठली औषधं वापरली त्याची माहिती दिली नाही, म्हणून हा गुन्हा नोंदवण्यात आला.

कायद्याची पायमल्ली करू नका :- सर्वसामान्य लोकांनी डॉक्टरांच्या चिट्ठीविना आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नये असं आवाहन अन्न आणि औषध विभागानं केलं. हॉस्पिटल, मेडिकल आणि डॉक्टर कोणीही कायदाची पायमल्ली करू नका. अन्यथा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएने दिला आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit