LIC Policy : जर एलआयसी पॉलिसी घेतली किंवा घ्यायची असेल तर चुकूनही करू नका ‘ही’ चूक; अन्यथा होणार नुकसान

MHLive24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) विविध प्रकारच्या योजना लोकांना देत असते. एलआयसीत लहान मुलांसह अगदी ज्येष्ठांपर्यंत आकर्षक योजना आहेत.(LIC Policy)

तुम्ही एलआयसी पॉलिसी घेत असाल किंवा तुम्ही ती घेतली असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पॉलिसी खरेदी करताना, तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला नॉमिनी बनवणे आवश्यक आहे.

जर तुम्ही पॉलिसी घेताना नॉमिनी केले नसेल आणि तुमच्यासोबत एखादी दुर्घटना झाली तर तुमच्या प्रियजनांना या रकमेपासून वंचित राहावे लागेल.

Advertisement

म्हणजेच नॉमिनी लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पॉलिसीचा क्लेम मिळण्यात कुटुंबाला कोणतीही अडचण येणार नाही आणि अनावश्यक वादही टाळता येतील.

नॉमिनी निवडताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

पॉलिसी घेताना नॉमिनीचे नाव ठरवा. परंतु लक्षात ठेवा की पॉलिसीसाठी योग्य नॉमिनी निवडणे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असाल, तर तुमच्या अनुपस्थितीत आर्थिक जबाबदारी घेण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीस नॉमिनीसाठी निवडा. बहुतेकदा ही जबाबदारी आपला पार्टनर उचलत असतो. मग तुम्ही त्याला नॉमिनी करू शकता.

Advertisement

एकापेक्षा जास्त नॉमिनी

असे अनेकवेळा दिसून आले आहे की काही लोकांना त्यांचे पैसे दोन लोकांमध्ये वाटून द्यायचे असतात. जसे पत्नी आणि मूल किंवा पत्नी आणि भाऊ किंवा आई. अशा परिस्थितीत, तुम्ही एकापेक्षा जास्त पॉलिसी खरेदी करून वेगवेगळ्या पॉलिसींसाठी स्वतंत्र नॉमिनी करू शकता.

किंवा पॉलिसी खरेदी करताना तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तींचा हिस्सा ठरवू शकता आणि त्यांना नॉमिनी बनवू शकता. यासाठी विमा कंपनीकडून पॉलिसी खरेदी करताना लेखी हमी घेतली जाऊ शकते.

Advertisement

नॉमिनी व्यक्तीस वेळेनुसार बदलता येऊ शकते

पॉलिसीधारक वेळोवेळी नॉमिनी देखील बदलू शकतो.
जर एखाद्या नॉमिनीचा मृत्यू झाला किंवा त्याला रोजगार मिळाला असेल आणि दुसऱ्या सदस्याला जास्त पैशांची गरज असेल तर नॉमिनी बदलला जाऊ शकतो.
याशिवाय, विवाह किंवा घटस्फोट झाल्यास नॉमिनी देखील बदलू शकतो.
यासाठी तुम्ही विमा कंपनीच्या वेबसाइटवरून नॉमिनी फॉर्म डाउनलोड करा किंवा कार्यालयातून हा फॉर्म कलेक्ट करा.
फॉर्ममध्ये नॉमिनी व्यक्तीचे तपशील भरा.
आता पॉलिसी डोक्यूमेंटची प्रत आणि नॉमिनीसोबत तुमच्या नातेसंबंधाची कागदपत्रे सबमिट करा.
जर एकापेक्षा जास्त नॉमिनी असतील तर प्रत्येकाचा हिस्सा देखील ठरवावा.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker