Alert for multiple SIM card users : एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरात असाल तर सावधान! लवकरच होणार ‘ही’ कारवाई

MHLive24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- आजकाल बहुतांश लोक मोबाईल वापरतात. यातील अविभाज्य भाग म्हणजे सिम कार्ड. परंतु बहुतांश लोकांकडे एकापेक्षा जास्त सिम असतात. या लोकांसाठी आता महत्वाची बातमी आहे.(Alert for multiple SIM card users)

आता 9 पेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या ग्राहकांच्या सिमची पुन्हा पडताळणी करण्याचे आणि पडताळणी न झाल्यास सिम बंद करण्याचे आदेश दूरसंचार विभागाने दिले आहेत. जम्मू-काश्मीर आणि आसामसह ईशान्येसाठी, ही संख्या 6 सिमकार्ड अशी आहे.

पुन्हा पडताळणी करावी लागेल

Advertisement

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, ग्राहकांकडे परवानगीपेक्षा जास्त सिमकार्ड असल्यास, त्यांना त्यांच्या आवडीचे सिम सुरू ठेवण्याचा आणि उर्वरित सिम बंद करण्याचा पर्याय दिला जाईल.

“विभागाने केलेल्या विश्लेषणादरम्यान, जर एखाद्या ग्राहकाकडे सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या विहित संख्येपेक्षा जास्त सिम कार्ड असल्याचे आढळले, तर सर्व सिमची पुन्हा पडताळणी केली जाईल,” असे विभागाने म्हटले आहे.

का घेतला हा निर्णय?

Advertisement

आर्थिक गुन्हे, आक्षेपार्ह कॉल्स, ऑटोमेटेड कॉल्स आणि फसवणुकीच्या घटनांचा तपास करण्यासाठी दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे.

दूरसंचार कंपन्या कारवाई करणार

विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नियमांनुसार वापरात नसलेले सर्व मोबाइल नंबर डेटाबेसमधून काढून टाकण्यास सांगितले आहे.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker