Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

व्होडाफोन – आयडीया चे ग्राहक असाल तर ही बातमी वाचाच !

0

व्ही यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपवरुन अवघ्या काही क्लिकमध्ये करू शकतील रिचार्ज. अलीकडेच व्हीआयने डिजिटल पेमेंट सेवा सुरू केली आहे. जाणून घ्या वापरण्याची संपूर्ण प्रक्रिया

व्होडाफोन आयडिया वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी आहे. आता व्हीआय वापरकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी पेटीएम, गुगल पे किंवा इतर कोणत्याही पेमेंट गेटवे अ‍ॅपवर जाण्याची गरज भासणार नाही. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.

Advertisement

आता व्ही यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपवरुन रिचार्ज करू शकतील आणि हे अवघ्या काही क्लिकमध्ये हे शक्य होईल. होय हे खरे आहे. अलीकडेच व्हीआयने डिजिटल पेमेंट सेवा सुरू केली आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहक आपली बिले भरण्यासाठी आणि रिचार्ज करण्यासाठी याचा लाभ घेऊ शकतात.

कंपनीने त्याच्या व्हर्च्युअल एजंट सेवेचे नाव व्हीआयसी (VIC ) ठेवले आहे. यासाठी कंपनीने एक व्हॉट्सअ‍ॅप नंबरही जारी केला आहे, ज्यामध्ये सर्व गेटवे किंवा यूपीआयमधून व्यवहार केले जातील .

Advertisement

जाणून घ्या ही सेवा कशी कार्य करेल

व्हीआय यूजर्सने अशा प्रकारे व्हाट्सअँप वरून करावे रिचार्ज

  • यासाठी vi ग्राहकांना त्याच्या फोनमध्ये 96542 97000 नंबर सेव्ह करावा लागेल.
  • यानंतर व्हॉट्सअ‍ॅप वरून या क्रमांकावर ‘हाय’ हा मेसेज पाठवावा लागेल.
  • मेसेजच्या उत्तरात, आपणास विचारलेल्या काही प्रश्नांचे उत्तरे देऊन आपण आपला नंबर रिचार्ज करू शकता .
  • पेमेंट व रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक मिळेल. अशा प्रकारे आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news

Advertisement