Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करून कुणी सिमकार्ड घेतले तर नाही ना ? ‘असे’ चेक करा किती कार्ड आहेत तुमच्या आधारकार्डवर

0 52

MHLive24 टीम, 25 जून 2021 :- आधार कार्ड भारतात राहणाऱ्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. बर्‍याच सरकारी योजनांशी संबंधित असल्याने ते एक महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. त्याचप्रमाणे पॅन कार्ड कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज बनले आहे.

बँक खाती उघडण्यापासून मालमत्ता खरेदी-विक्री, वाहने खरेदी-विक्री, आयकर विवरणपत्र भरणे यापासून इतर अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे सिम कार्ड घेतानाही आधार कार्डची गरज लागते. परंतु बऱ्याचदा आपल्या आधार कार्डवर दुसऱ्याच कुणी सिम कार्ड घेतले जाण्याची शक्यता वाढते.

Advertisement

आता सध्या फिंगरप्रिंट घेणे जातात त्यामुळे ही शक्यता कमी झाली आहे. परंतु पूर्वी अशी पदःत नव्हती. अनेकदा याचा गैरवापरही केला जायचा. जर आपल्याला अशा परिस्थितीत हे शोधायचे असेल की आपल्या आधार कार्डवरून दुसऱ्या कोणी सिमकार्ड घेतले आहे का?

तर तुम्ही ते सहज शोधू शकता. आधार कार्डवर किती सिमकार्ड घेण्यात आले आहेत याची माहिती कशी करून घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Advertisement

अशा प्रकारे शोधा आपल्या आधार क्रमांकावर किती सिमकार्ड रजिस्टर आहेत 

 • आधार कार्डशी किती नंबर लिंक आहेत हे शोधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
 • हे जाणून घेण्यासाठी, आधार वेबसाईट यूआयडीएआयला (UIDAI) भेट द्या.
 • यानंतर होम पेजवर Get Adhaar वर क्लिक करा.
 • त्यानंतर Download Adhaar वर क्लिक करा.
 • आता तिथे View More पर्यायावर क्लिक करा.
 • येथे Adhaar Online Service वर जाऊन Aadhaar Authentication History वर जा.
 • आता येथे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
 • येथे एक नवीन इंटरफेस ओपन होईल. आता आपला आधार नंबर येथे टाईप करा आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि ओटीपीवर क्लिक करा.
 • आता येथे Authentication Type वर All सिलेक्ट करा.
 • आता तुम्हाला तिथे कालावधी ठरवण्यासाठी तारीख भरावी लागेल.
 • आता येथे ओटीपी टाकून वेरिफाय ओटीपी वर क्लिक करा.
 • असे केल्यावर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल. येथून आपण आपल्या डिटेल्स मिळवू शकता.

 

Advertisement
 • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
 •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit