IDFC First Bank
IDFC First Bank

MHLive24 टीम, 18 मार्च 2022 :- IDFC First Bank : बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, सदर कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला काही प्रमाणात आर्थिक मदत करत असतात. ही मदत ठराविक असते. तर काही वेळा कंपनीचे अधिकारी मर्यादेपलीकडेही मदत करतात. असे असताना आज तुम्हाला थक्क करणारी बातमी आपण घेऊन आलो आहोत.ही बातमी आहे IDFC First बँकबाबत!

आयडीएफसी फर्स्ट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ व्ही वैद्यनाथन यांनी आपल्या मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना अशी मदत केली आहे की लोक त्यांच्या औदार्याचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाहीत.

2 कोटी शेअर्स दिले

रिपोर्टनुसार, सीईओ व्ही वैद्यनाथन यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांचे 5 लाख शेअर्स दिले. या शेअर्सची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने गुरुवारी स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या नोटीसमध्ये ही माहिती दिली आहे.

बँकेने म्हटले आहे की एमडी आणि सीईओ व्ही वैद्यनाथन (आयडीएफसी फर्स्ट बँकेचे सीईओ) त्यांच्या उदारतेसाठी प्रसिद्ध आहेत. पुन्हा एकदा त्यांनी एका मृत सहकाऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत, त्यांनी आपल्याजवळ ठेवलेले बँकेचे 5 लाख शेअर्स मृतांच्या कुटुंबियंना दिले, ज्यांची सध्याची किंमत 2.1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

आधीच औदार्य दाखवले आहे

व्ही वैद्यनाथन हे भूतकाळात अनेक वेळा त्यांचे कर्मचारी, प्रशिक्षक, घरगुती मदतनीस आणि ड्रायव्हर यांना मदत करून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कधी त्यांना कार किंवा घर घेण्यासाठी मदत केली आहे तर कधी मुलांच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी भेट म्हणून शेअर्स दिले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैद्यनाथन यांनी आतापर्यंत 9 लाखांहून अधिक शेअर्स गिफ्ट केले आहेत, ज्यांची किंमत 3.95 कोटी रुपयांहून अधिक आहे, ते त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup