‘ह्या’ बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! होम लोन घेतले असेल तर तुमच्या हप्त्याची रक्कम होऊ शकते कमी

MHLive24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  आपण घर विकत घेण्याचा विचार करत असल्यास आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. किंवा आपण गृहकज घेतले असेल तरी देखील आपला फायदाच आहे. ICICI बँकेने आपल्या व्याजदराबाबत कपातीचे धोरण अंगिकारले आहे. सविस्तर फायदे जाणून घेऊयात ( ICICI Banks Home loan ineterest rates )

आयसीआयसीआय (इंडस्ट्रियल क्रेडिट व इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) एक बहुराष्ट्रीय बँक आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंग, व्हेंचर या क्षेत्रात विस्तृत उत्पादने आणि सेवा उपलब्ध करुन देत आहे. या बँकेचे देशभरात 5275 शाखा आणि 15589 एटीएमचे चांगले नेटवर्क आहे आणि 17 परदेशी देशांमध्येही त्याचे अस्तित्व आहे. आपण आपले स्वप्नातील घर विकत घेऊ इच्छित असल्यास आयसीआयसीआयगृह कर्ज तुम्हाला खूप मदत करेल. आणि आता आणखी एक खुशखबर आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी ठेवल्याने गृहकर्ज घेतलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. आयसीआयसीआय बँकेने गृहकर्जाचा व्याजदर कमी केला आहे. 1 सप्टेंबरपासून नवे व्याजदर लागू झाले आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून याबद्दल कळवले आहे.

Advertisement

त्यानुसार 1 सप्टेंबरपासून गृहकर्जाच्या नव्या व्याजदरानुसार तुमच्या कर्जाचा मासिक हप्ता (EMI) ठरेल. ICICI बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गृहकर्जावर 7.25 टक्के इतका I-MCLR1Y लागू करण्यात आला आहे. सप्टेंबरपूर्वी MCLR च्या बेसिस पॉईंटनुसार ICICI बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर 7.7 टक्के इतका होता. 1 सप्टेंबरपासून तो 7.55 टक्के इतका असेल. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून आयसीआयसीआय बँकेतून गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा प्री- ईएमआयचा हप्ता किंचित का होईना पण कमी होईल.

एमसीएलआर म्हणजे काय ? :- बँकांकडून एमसीएलआरची वाढ किंवा घट झाल्यास याचा परिणाम नवीन कर्ज घेणारे तसेच एप्रिल 2016 नंतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर होतो. वास्तविक एप्रिल 2016 पूर्वी रिझर्व्ह बँकेने कर्जासाठी निश्चित केलेला मिनिमम रेट बेस रेट म्हणजे एमसीएलआर .

म्हणजेच बँका यापेक्षा कमी दराने ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाहीत. एमसीएलआर 1 एप्रिल 2016 पासून बँकिंग प्रणालीमध्ये अंमलात आला आणि कर्जाचा किमान दर ठरला. म्हणजेच त्यानंतर केवळ एमसीएलआरच्या आधारे कर्ज सुरू करण्यात आले.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker