Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

Google पे द्वारे आपण एका दिवसात किती पैसे ट्रांसफर करू शकता ? जाणून घ्या आपल्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर

0 5

MHLive24 टीम, 12 जुलै 2021 :- कोरोना काळात यूपीआय पेमेंट्स खूप वाढले आहेत आणि लोक गूगल पे, फोन पे, पेटीएम आणि इतर अ‍ॅप्सचा वापर करत आहेत. तथापि, यूपीआय मोडमध्ये केलेल्या पेमेंट्सची स्वतःची मर्यादा आहे, ज्याबद्दल काही लोकांना माहिती आहे.

अशा परिस्थितीत, अनेकांना Google पे द्वारे आपण एका दिवसात किती पैसे ट्रांसफर करू शकतो असा प्रश्न पडतो. तर आज आम्ही आपणास या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत की अॅपची ट्रान्सफर मर्यादा काय आहे जी आपण वापरत आहोत.

Advertisement

सर्व UPI Apps द्वारे एक लाख रुपयांहून अधिक पैसे पाठवण्याचा प्रयत्न केल्यास हे लिमिट पूर्ण होतं. जर एखाद्याने 2000 रुपयांहून अधिकची रिक्वेस्ट केल्यासही ट्रान्सफर लिमिट पूर्ण होऊ शकते. युजरच्या बँक अकाउंटनुसार गुगल पेसाठीचं लिमिट वेगवेगळंही असू शकतं. काही वेळा अधिक पैसे पाठवण्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागू शकते.

याशिवाय,पेमेंट न होण्याची आणखी काही कारणे आहेत जी खाली नमूद आहेत

बँक मर्यादा हे कारण असू शकते :- जर आपले डेली ट्रांजैक्शन UPI लिमिट (अधिकतम एक लाख रुपये) पेक्षा कमी असेल आणि तरीही आपणास अडचणी येत असतील तर दुसरी बँक वापरुन पहा. असे होऊ शकते की आपल्या बँकेने आपण किती पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकता यावर एक प्रकारची मर्यादा घातली आहे. याबद्दल माहिती मिळविण्यासाठी आपल्याला आपल्या बँकेशी संपर्क साधावा लागेल.

Advertisement

अन्य कारणांमुळे देखील व्यवहार थांबू शकतात :- युजरला फ्रॉडपासून वाचवण्यासाठी काही ट्रान्झेक्शन रिव्ह्यू करण्यासाठी रोखले जाऊ शकतात. जर युजरने दररोजचं लिमिट एक लाख पूर्ण केलं नसेल आणि तरीही ट्रान्झेक्शनमध्ये समस्या येत असल्यास युजर गुगल पे सपोर्टशी संपर्क करू शकतात. एक रुपयाहून कमी ट्रान्झेक्शन करता येणार नाही आणि सतत एरर मेसेज दिसत राहील.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement