Cement prices will increase : घर बांधणाऱ्यांचे बजेट कोलमडणार ! सिमेंटचे भाव गगनाला भिडणार; जाणून घ्या सर्व काही

MHLive24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- मागील काही दिवसांत महागाई सातत्याने वाढत आहे. आता जर तुम्ही घर बांधायला घेत असाल तर तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी आहे.(Cement prices will increase)

गेल्या काही महिन्यांपासून सिमेंटचे भाव सातत्याने वाढत आहेत. आणि आता पुढील काही महिन्यांत सिमेंटच्या किरकोळ किमती पुन्हा 15-20 रुपयांनी वाढू शकतात.

त्यामुळे सिमेंटची प्रति बॅग किंमत 400 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचू शकतात. क्रेडिट निर्धारित करणारी एजन्सी क्रिसिलने गुरुवारी ही माहिती दिली.

Advertisement

सिमेंटच्या भरमसाठ किमती वाढण्यामागे पुढील करणे आहेत – एक म्हणजे मागणी प्रचंड वाढली आहे. दुसरे म्हणजे कोळसा आणि डिझेलसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ.

किमती वाढण्याची कारणे 

क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटले आहे की, वाढत्या इनपुट खर्चामुळे किमती वाढल्याने, सिमेंट कंपन्यांचे व्याज, कर, घसारा आणि अर्निंग बिफॉर इंट्रस्ट या आर्थिक वर्षात प्रति टन 100-150 रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे .

Advertisement

कोळशाच्या किमतीत वाढ (पहिल्या भागात 120 टक्क्यांहून अधिक) आणि पेटकोक (80 टक्क्यांनी जास्त) ऊर्जा आणि तेलाच्या किमती या आर्थिक वर्षात प्रति टन 350-400 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. या आवाहलात असे म्हटले आहे की किमतीतील महागाईचा मोठा हिस्सा अजून येणे बाकी आहे.

सिमेंट विक्रीमध्ये 11-13% वृद्धी होईल

चालू आर्थिक वर्षात सिमेंट विक्री 11-13 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, गेल्या वर्षी तुलनात्मक आधार कमकुवत झाल्यामुळे हे घडले आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सिमेंटच्या मागणीत 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली, परंतु दुसऱ्या सहामाहीत ती 3-5 टक्क्यांपर्यंत वाढली पाहिजे. चालू आर्थिक वर्षात 11-13 टक्के वाढ दिसू शकते.

Advertisement

देशभरात वाढतीये सिमेंटची डिमांड

रीजनल लेवलवर, दक्षिण भारतात मागील महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये प्रति बॅग 54 रुपयांची वाढ झाली आहे, त्यानंतर मध्य प्रदेशात प्रति बॅग 20 रुपये वाढ झाली आहे. उत्तरेमध्ये चांगली मागणी असल्याने 12 रुपयांनी वाढ झाली, तर पश्चिमेत प्रति गोण 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker