Honda's Offer
Honda's Offer

MHLive24 टीम, 20 मार्च 2022 :- Honda’s Offer : जर तुम्हाला नविन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. तुमचे कार खरेदीचे स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकते कारण होंडा कंपनी स्वस्तात कार देऊ करत आहे. होंडाने आपल्या अनेक मॉडेल्सवर सवलतीच्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. नवीन कार खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्या खरेदीदारांना आकर्षक ऑफर देत आहेत.

होंडाच्या हॅचबॅक ते सेडान कार त्यांच्या प्रिमियम गुणवत्तेसाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या कारमध्ये उत्तम वैशिष्ट्यांसह, मजबूत मायलेज देखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला होंडा कार देखील आवडत असतील आणि जर तुम्ही त्या खरेदी करण्याची तयारी करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला या कंपनीच्या गाड्यांवर मिळणाऱ्या सवलतींची माहिती देणार आहोत.

होंडा अमेझ

Honda Amaze ही एक उत्तम सेडान आहे जी मध्य श्रेणीत येते. कंपनी या कारवर ₹ 4,000 ची कॉर्पोरेट सूट देत आहे. या कारवर आत्तापर्यंत कोणतीही रोख सवलत किंवा एक्सचेंज बोनस ऑफर केला जात नाही.

होंडा WRV

Honda WRV हे भारतीय बाजारपेठेत सध्याचे अतिशय लोकप्रिय क्रॉसओवर आहे ज्यावर कंपनी 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.

होंडा जॅझ

Honda Jazz त्याच्या उत्कृष्ट लुकसाठी चांगलीच पसंत केली जाते. ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. कंपनी या कारवर 10,000 रुपयांची कॅश डिस्काउंट ऑफर करत आहे, परंतु तुम्ही ही सूट न घेतल्यास तुम्हाला 12,158 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीजचा पर्याय म्हणून मिळेल.

यासोबतच या हॅचबॅकवर कंपनीकडून 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

होंडा सिटी

Honda City च्या पाचव्या जनरेशनच्या मॉडेलवर तुम्हाला 10,000 रुपयांची रोख सूट मिळेल. ही कंपनीची प्रीमियम सेडान सेगमेंटची कार आहे. रोख सवलतीचा पर्याय म्हणून 10,596 मोफत अॅक्सेसरीज दिल्या जात आहेत.

कंपनी या सेडानवर 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील देत आहे. होंडा सिटीच्या चौथ्या जनरेशन मॉडेलवर कंपनीकडून 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit