Best indian youtube channel : भारतीच्या ‘ह्या’ यूट्यूब चॅनलने रचला इतिहास! जगातील सर्व चॅनेल्सला मागे टाकत पोहोचले एक नम्बरला

MHLive24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- सध्या करमणुकीची अनेक साधने आणि प्रकार आले आहेत. यामध्ये युट्युब ने मोठी जागा लोकांच्या जीवनात मिळवली आहे.(Best indian youtube channel )

अनेक चॅनेल्स आहेत की  जे यु ट्यूबच्या माध्यमातून लोकांना कन्टेन्ट देऊन लोकप्रिय होत आहेत. त्यातून त्यांची कमाई होते. परंतु आता या सर्वांचे रेकॉर्ड एका युट्युब चॅनेलने मोडले आहे.

देशातील सर्वात मोठे म्युझिक लेबल आणि मूव्ही स्टुडिओ, T-Series च्या YouTube चॅनेलने अलीकडच्या काळात मोठे यश संपादन केले आहे.

Advertisement

T-Series च्या YouTube चॅनेलच्या सब्सक्राइबर्स ची संख्या 200 मिलियन पार झाली आहे. आत्तापर्यंत जगातील कोणत्याही यूट्यूब चॅनलसोबत असे घडलेले नाही. त्याबद्दल जाणून घेऊया.

T-Series हे जगातील सर्वाधिक सबस्क्राइब केलेले YouTube चॅनल बनले आहे

म्यूजिक लेबल T-Series आज जगातील सर्वात लोकप्रिय YouTube चॅनेल बनले आहे कारण त्याचे एकूण  200 मिलियन  पेक्षा जास्त सब्सक्राइबर्स आहेत.   जगभरात असे कोणतेही YouTube चॅनल नाही ज्याने सबस्क्राइबरच्या बाबतीत हा आकडा ओलांडला असेल. टी-सीरीज आपल्या बॅनरखाली गाणी तसेच चित्रपट तयार करते.

Advertisement

सब्सक्राइबर्स  संख्या

T-Series चे 29 YouTube चॅनेल आहेत जे विविध प्रकार आणि भाषांमध्ये कंटेन्ट प्रदान करत आहेत. या चॅनेलचे एकत्रितपणे 383 मिलियन पेक्षा जास्त सब्सक्राइबर्स आहेत आणि व्यू काउन्ट च्या संख्येचा विचार केला तर ते 718 अब्जांपेक्षा जास्त आहे.

टी-सीरीजचे अध्यक्ष, नीरज कल्याण जी म्हणतात की, गेल्या काही वर्षांत टी-सीरीजचा कंटेंट देशात आणि इतर देशांमध्येही खूप पाहिला गेला आहे आणि असे स्थान मिळवणे ही मोठी गोष्ट आहे.

Advertisement

टी-सीरीजचे अध्यक्ष भूषण कुमार यांनी दिली ही माहिती

T-Series चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांनी T-Series च्या या यशाचे श्रेय जगभरातील चाहत्यांना आणि T-Series ला यशस्वी करण्यासाठी अहोरात्र योगदान देणाऱ्या त्यांच्या टीमला दिले आहे. ते म्हणतात की या यशाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की कंटेन्ट सर्वात मोठी गोष्ट आहे आणि जर लोकांना कन्टेन्ट आवडला  तरच चॅनल पुढे जाईल.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker