तुम्हाला एफडी पेक्षाही जास्त व्याज मिळेल; कसे? जाणून घ्या इतर पर्याय

MHLive24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- दीर्घकालीन गुंतवणूक करताना प्रत्येकजण जास्त फायदा कसा मिळेल, याचा विचार करत असतो. कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्यामुळे बँकांनी मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी केला आहे. ( Higher interest than FD )

बँकांनी अलीकडेच मुदत ठेव (एफडी) व्याज दरात लक्षणीय घट केली आहे. याची अनेक कारणे आहेत. कर्ज देण्याची आणि जास्त पैसे मिळवण्याच्या संधींचा अभाव यापैकी मुख्य आहेत. त्यामुळे आता गुंतवणूकदार सुरक्षित आणि चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या पर्यायांच्या शोधात आहेत. चला जाणून घेऊयात यापैकी काही पर्याय

1. वॉलेंटरी प्रोविडेंट फंड (वीपीएफ) :- जर एखादा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) अंतर्गत नोंदणीकृत असेल तर तो आपल्या इच्छेनुसार अतिरिक्त गुंतवणूक देखील करू शकतो. याला व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) म्हणतात. हे तीन स्तरांवर कर लाभ प्रदान करते. व्हीपीएफमध्ये गुंतवणूकीसाठी कलम 80 सी अंतर्गत कराचा लाभ आहे. वार्षिक व्याजातून मिळणारी कमाई देखील करमुक्त असते.

Advertisement

व्हीपीएफची एकमेव समस्या अशी आहे की कोणीही हा निधी आपल्या मनाला येईल तेव्हा काढून घेऊ शकत नाही. निवृत्तीनंतरच या निधीतून संपूर्ण पैसे काढता येतात. तथापि, भविष्यासाठी गुंतवणूक करणार्‍या तरुण कर्मचाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे सुमारे 8.5 टक्के वार्षिक परतावा देते.

2. सुकन्या समृद्धी योजना :- मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. केंद्र सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर 7.6 टक्के केले असून या योजनेला सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते.

3. ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत खाते :- 60 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकते. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात.

Advertisement

या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये साठवून ठेवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला 7.9 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज 31 मार्च/30 सप्टेंबर/ 31 डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू होते.

4. स्मॉल फायनान्स बँक :- देशातील प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांनी बचत खाते आणि मुदत ठेव योजनांवरील व्याजदर घटवला असला तरी स्मॉल फायनान्स बँक आणि काही बिगरबँकिंग वित्तसंस्थांकडून फिक्स्ड डिपॉझिटवर आकर्षक व्याज दिले जात आहे. त्यामुळे या स्मॉल फायनान्स बँकांची पार्श्वभूमी व्यवस्थित तपासून त्यामध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

5. म्युच्युअल फंड :- दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. यामधील पैसे भांडवली बाजारात गुंतवले जात असल्याने गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळतो. तज्ज्ञ व्यक्ती आणि कंपन्यांकडून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे तुम्हाला फारशी चिंता करण्याचे कारण नसते.

Advertisement

6. इक्विटी :- पैसे कमावण्याचा झटपट मार्ग म्हणून भांडवली बाजाराकडे पाहिले जाते. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे जोखमीचे काम असले तरी योग्य धोरण आखून दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणुकीवर तुलनेत जोखीमही कमी असते. त्यामुळे ब्लु चीप किंवा मिड कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरतो.

7. मासिक उत्पन्न योजना :- एमआयएस ही एक छोटी बचत योजना आहे, ज्यात आपल्याला दरमहा पैसे गुंतवून पैसे कमविण्याची संधी मिळते. या योजनेत आपल्याला 7.6 टक्के व्याज मिळतं. या पोस्ट ऑफिस योजनेत एकरकमी गुंतवणूक करून आपल्याला दरमहा व्याज म्हणून उत्पन्न मिळते. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker