शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला हायकोर्टाचा दिलासा

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात 23 ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. दोन्ही प्रकरणाची सुनावणी एकत्र घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे.सरनाईक कुटुंबीयांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

ईडीच्या कारवाईविरोधात याचिका :- एनएसईएल आणि टॉप्स सिक्युरिटीज प्रकरणात ईडीच्या कारवाईविरोधात प्रताप सरनाईक यांच्यासह विहंग आणि पूर्वेश या त्यांच्या दोन्ही मुलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनी लॅाड्रिंग प्रकरणामुळे ईडीच्या रडारवर असलेल्या सरनाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाने 28 जुलै पर्यंत दिलासा दिला होता.

टिटवाळा जमीन गैरव्यवहार प्रकरण :- सरनाईक आणि त्यांची मुले विहंग आणि पूर्वेश यांच्यासह निकटवर्तीय योगेश चंडेला यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. अमंलबजावणी संचालनालयाने टिटवाळा जमीन गैरव्यवहार आणि एनएसईएल यामध्ये चौकशी करण्यासाठी समन्स बजावले होते. टिटवाळा जमीन गैरव्यवहार प्रकरणात जमीनींच्या खरेदी विक्री बाबत आरोप करण्यात आले आहेत.

Advertisement

बावीस कोटी रुपयांच्या व्यवहारात फसवणूक :- सरनाईक यांच्या विहंग गृहनिर्माण कंपनीने एक गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला होता. यासाठी टिटवाळामध्ये काही जमिनी खरेदी केल्या होत्या; मात्र सुमारे बावीस कोटी रुपयांच्या या व्यवहारात फसवणूक केली असा आरोप करण्यात आला आहे.

यामध्ये देशमुख आणि सरनाईक यांच्या खात्यात पैसे वळविले असा आरोप केला जात आहे. ईडीने 2014 मध्ये भूखंड ताब्यात घेऊन सर्व व्यवहार थांबविले आहेत; मात्र आता हा भूखंड पुन्हा विक्रीला काढल्याचे उघड झाले आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker