High alert from SBI: SBI कडून हाय अलर्ट! ग्राहकांनी चुकूनही करू नये ‘हे’ काम, अन्यथा खाते होईल रिकामे

MHLive24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- सध्या सर्वांचेच बँकेत खाते असते. बँक ग्राहकासांठी विविध सोयी देत असतात. सध्या डिजिटल व्यवहारांचा कल वाढला आहे.(High alert from SBI)

कोरोनाच्या कालावधीनंतर यात जास्त वाढ झाली. परंतु ऑनलाईन व्यवहारांमुळे सायबर क्राईम देखील सक्रिय झाले आहेत.

लोक या ऑनलाईन फ्रॉडला बळी पडत असल्याच्या बातम्या रोज ऐकायला मिळतात. अशा परिस्थितीत, आपण आपली वैयक्तिक माहिती कोणाबरोबर शेअर करावी हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

Advertisement

बँकिंग फसवणूक का होतात ?

बहुतेक सणासुदीच्या हंगामात, लोक मोफत गिफ्ट किंवा व्हाउचरबद्दल उतावीळ असतात. अशा परिस्थितीत जेव्हा-जेव्हा मोफत गिफ्ट भेटण्याचा मॅसेज येतो तेव्हा लोक त्यात इंटरेस्ट घेतात. काही लोक यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात, जे हानिकारक आहे.

या मोफत भेटवस्तूंच्या बाबतीत, ग्राहक या बनावट लिंकवर क्लिक करतात आणि काही मिनिटांत त्यांचे सर्व कष्टाचे पैसे गमावतात. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा देते.

Advertisement

ट्विट करून बँकेने केले अलर्ट!

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले आहे की, SBI तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स, ATM आणि UPI पिन शेअर करण्यास कधीच सांगत नाही.

त्यामुळे तुम्हाला एटीएम किंवा यूपीआय पिन विचारणारे किंवा लिंकवर क्लिक करण्यास सांगणारे मेसेज आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. काही सायबर ठग ग्राहकांना SBI च्या नावाने मेसेज करून तपशील विचारत आहेत त्यांस बळी पडू नका

Advertisement

ग्राहक सावध रहा

SBI ग्राहकांना खाते क्रमांक, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड तपशील विचारत नाही.
तुमचे इंटरनेट बँकिंग आणि ओटीपी क्रमांक कोणाशीही शेअर करू नका.
मोबाईल फोन किंवा मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

योग्य संदेश ओळखा

Advertisement

सायबर गुंडांनी पाठवलेले हे बनावट संदेश समजणे सोपे आहे, कारण या संदेशांमध्ये स्पेलिंगची चूक नक्कीच असते. जर तुम्हाला असे मेसेज येत असतील तर आधी हे मेसेज काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर बनावट संदेश आढळल्यास, ग्राहक सायबर क्राईम वेबसाइट https://cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवू शकतात. किंवा तुम्ही हेल्पलाइन नंबरवरही याबाबत माहिती देऊ शकता.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker