Hero Motocorp Offer
Hero Motocorp Offer

MHLive24 टीम, 09 मार्च 2022 :- Hero Motocorp Offer : जर तुम्ही नविन स्कूटी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत जी वाचून तुम्ही थक्क व्हाल. होय आटा तुम्ही नवीन स्कूटी खरेदी करू शकता आणि ती ही फक्त 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटसह. देशातील प्रसिद्ध दुचाकी कंपनी Hero MotoCorp ने मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या संदर्भात मोठी घोषणा केली.

ऑफर 11 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे

Hero MotoCorp च्या मते, ही ऑफर फक्त निवडक शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे आणि 11 मार्चपर्यंत सुरू राहील. या काळात तुम्ही जवळपासच्या हिरो शोरूमला भेट देऊन कोणतीही स्कूटी किंवा स्कूटर खरेदी करू शकता. कंपनीचा दावा आहे की 1 रुपये डाउन पेमेंटच्या सुविधेसोबतच कॅश बोनस ऑफरही सुरू करण्यात आली आहे.

6 हजार रुपयांपर्यंत बोनस मिळत आहे

कंपनीच्या मते, मेस्ट्रो एज 125, डेस्टिनी 125 आणि प्लेजर प्लसच्या खरेदीवर महिलांना 4,000 रुपयांपर्यंतचा रोख बोनस दिला जात आहे. यासोबतच Destini 125 बाइकच्या खरेदीवर 2,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देखील उपलब्ध आहे.

महिलेच्या नावाने बुकिंग करता येते

कंपनीचे म्हणणे आहे की, जर एखाद्या कुटुंबाने त्यांच्या कुटुंबातील महिलेच्या नावाने बुकिंग केले तर त्यांनाही या ऑफर दिल्या जातील. बाजारात Destini 125 ची किंमत 70,400 रुपये, Maestro Edge 125 ची किंमत 73,450 रुपये आणि Maestro Edge 110 ची किंमत 66,820 रुपये आहे. अशा परिस्थितीत 4 ते 6 हजार रुपयांची सूट तुमच्यासाठी मोठा दिलासा असेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup