Hero Electric Scooter
Hero Electric Scooter

MHLive24 टीम, 26 मार्च 2022 :- Hero Electric Scooter : सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांची भरपूर चर्चा सुरू आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव यामुळे अनेक नागरिक इलेक्ट्रिक विकत खरेदी करण्याच्या विचारात आहेत. अनेकांनी तर ऑनलाइन इलेक्ट्रिकल वाहनांची बुकिंग सुरू केली आहे. दरम्यान आज आपण अशाच एका इलेक्ट्रिक स्कूटर बाबत जाणून घेणार आहोत.

दरम्यान देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो देखील मार्च 2022 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकते. काही महिन्यांपूर्वी कंपनीचे चेअरमन आणि सीईओ डॉ पवन मुंजाल यांना अशाच एका स्कूटरच्या प्रोटोटाइपसह दिसले होते. तेव्हापासून ही बातमी चर्चेत होती.

सध्या कंपनीने या स्कूटरची किंमत आणि फीचर्सचा तपशील दिलेला नाही, यासाठी ग्राहकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

हिरो इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

या स्कूटरच्या अधिकृत फीचर्सबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पण रिपोर्टवर विश्वास ठेवला तर त्याच्या पुढच्या बाजूला 10-इंचाचे आणि 12-इंच रिअलमध्ये अॅलॉय व्हील दिले जाऊ शकतात. या स्कूटरमध्ये सर्व लेटेस्ट फीचर्स पाहायला मिळतील.

त्याची थेट स्पर्धा Ola S1 Pro, बजाज चेतक, Okhi 19 शी होणार आहे. त्याच वेळी, होंडा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली Activa इलेक्ट्रिक देखील लॉन्च करू शकते. कंपनी लवकरच त्याची माहिती शेअर करणार आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup