Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

२५ वर्षांचे होताच करावयाच्या ‘ह्या’ १० गोष्टी; ज्यामुळे तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल

0 41

MHLive24 टीम, 15 जुलै 2021 :- जीवनात यशस्वी प्रत्येकाला व्हायचं आहे. आणि यशस्वी होण्याासाठी प्रत्येकाला अगदी सोपा मार्ग हवा आहे. उत्कर्ष आणि उन्नती ही दोन यशाची चाके आहेत. त्यामुळे प्रत्येकाला उत्कर्ष आणि उन्नती करायची आहे. अशावेळी काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. ज्यामुळे तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल आणि हे यश तुमच्यासोबत चिरंतर राहिल.

तुमच्या पंचविशीत (वय 25) तुम्ही जे करता त्यावर तुमच्या आयुष्याची पुढील दिशा अवलंबून असते. वयाच्या विशीतच तुम्ही तुमच्या करियरचा पाया घालत असता त्यातून तुम्हाला योग्य दृष्टीकोन, अनुभव, कौशल्ये आणि ज्ञानदेखील मिळत असते. आयुष्याच्या या टप्प्यात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून भविष्यात तुम्ही यशस्वी व्हाल ते जाणून घेऊया.

Advertisement

१. तुमची आवड ओळखा :- तुम्हाला नेमके काय आवडते आणि काय आवडत नाही हे जाणून घेण्यासाठी वयाची विशी ही अतिशय योग्य वेळ असते. या वयात तुम्ही मोठी स्वप्ने पाहायची असतात, नवनवीन कल्पनांवर काम करायचे असते आणि तुमच्या आवडींचा उपयोग करून आयुष्याची पुढील वाटचाल करायची असते. या टप्प्यावर आपल्याला नेमके काय आवडते ते ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

२. आयुष्यासंदर्भातील मूलभूत कौशल्ये विकसित करा :- तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करियर करा, काही अशा बाबी आहेत, काही अशी कौशल्ये आहेत जी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतात. अनिश्चिततेला कसे सामोरे जायचे, ताणतणाव कसे हाताळायचे, अपयश कसे पचवायचे ही कौशल्ये तुम्ही याच वयाच आत्मसात करायची असतात.

Advertisement

३. समाधानी राहु नका :- तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर, तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत आत्ता ज्या ठिकाणी आहात त्यावर कधीच समाधानी राहू नका. तुम्ही सतत उच्च ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करायचा असेल किंव्हा नोकरी एक एक टप्पा पार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

४. नेटवर्क बनवणे :- योग्य पद्धतीने तयार केलेले विविध क्षेत्रातील माणसांचे नेटवर्क हा जीवनातील अतिशय कळीचा मुद्दा असतो. त्याची सुरूवात वयाच्या विशीतच होते आणि ते तुम्हाला पुढे आयुष्यभर उपयोगी पडते. तुमच्या करियरमधील प्रगती, करियरच्या विविध संधी यासाठी हे नेटवर्क उपयुक्त असते.

Advertisement

तुम्हाला भविष्यात उपयोगी ठरणारे मजबूत नेटवर्क वयाच्या विशीतच तयार करा. त्यात तुमचे मित्र, सहकारी, मार्गदर्शक आणि इतर परिचित खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

५. पैशाचे नियोजन शिका :- वयाच्या विशीत तुम्ही आयुष्यातील विविध महत्त्वाचे निर्णय घेत असता. हे सर्व करत असताना तुमच्याकडे असलेल्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. भविष्यात आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यसाठी हाच गुण निर्णायक ठरतो.

Advertisement

तुम्ही श्रीमंत होणार की नाही ते बरेचसे तुमच्या आर्थिक व्यवस्थापनावर अवलंबून असते. तुम्ही विशीत घेतलेले पैशांसंबंधीचे निर्णय भविष्यातील अनेक दशकांवर प्रभाव टाकतात हे नेहमी लक्षात ठेवा.

६. व्यसनांपासून दूर रहा. तंबाखू, सिगरेट, दारू या गोष्टींपासून सतत दूर राहा. व्यसनांमुळे आयुष्य कमी होते. त्यामुळे चांगल्या गोष्टींची सवय लावा.

Advertisement

७. भौतिक सुखापेक्षा शारीरिक सुखाचा विचार करा. अंतर्मन कसं आनंदी राहील याचा विचार करा. चांगल्या गोष्टी करण्यासाठी अग्रेसर राहा. सकारात्मक विचार अट्टाहासाने करा.

८. चांगल्या संगतीत राहा. कामय काही ना काही नवनवीन गोष्टी शिकत राहा. आणि यासाठी चांगल्या लोकांच मार्गदर्शन महत्वाच आहे.

Advertisement

९ . सामर्थ्य : आपल्या शक्ती-सामर्थ्याच्या जोरावर आपण कुठलेही काम यशस्वीरीत्या पूर्ण करू शकतो. प्रत्येक मनुष्यामध्ये अदृश्य शक्तीचे अफाट असे भांडार असते. ते ओळखून जागृत करण्याची खरी आवश्यकता असते.

१०. स्पर्धा : यशस्वी होण्याचे सहावे सूत्र म्हणजे तीव्र स्पर्धा हेच आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात वरील सहा सूत्रांचे चिंतन करून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास तुम्ही यशापासून जास्त काळ दूर राहणर नाहीत.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement