Healthy diet during festive season : सणासुदीच्या काळात आरोग्यदायी आहार घ्या

MHLive24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- आता सणासुदीच्या काळाला सुरुवात झाली आहे. या काळात नानाविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. शिवाय हे वातावरणच इतके उत्साही असते, सतत कोणी ना कोणी आपल्या घरी येत असते किंवा आपण जात असतो, त्यामुळे वेळी-अवेळी खाणं होतं. पथ्यं मोडतात. परिणामी, पोट बिघडतं, डोकं दुखतं, पित्त होतं.(Healthy diet during festive season)

थोडक्यात, आरोग्य समस्या डोक वर काढतात आणि आपल्या आनंदात बाधा आणतात. खरंतर आपल्याकडे सणाच्या निमित्तानं होणारा स्वयंपाक हा त्या त्या क्रतूशी आणि आपल्या आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे तो आपल्याला बाधणारा कधीच नसतो.

सणांच्या निमित्ताने ज्या भाज्या किंवा पदार्थ करण्याची प्रथा आहे, ते सगळे त्या क्रतूत येणारे आणि शरीराला पोषकता देणारे असतात. उदाहरणार्थ गणपती बाप्पासाठी केले जाणारे उकडीचे मोदक चव आणि पौष्टिकतेचा उत्तम मेळ आहे, पण समस्या तेव्हा उत्पन्न होते जेव्हा आपण त्याचं जास्त प्रमाणात सेवन करतो. आपण अशा काही टिप्स बघणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ निश्‍चितपणे खाऊ शकाल, तेसुद्धा कोणताही ताण न घेता.

Advertisement

अतिरेक टाळा 

कोणताही पदार्थ कितीही पौष्टिक असला, तरी तो तेव्हाच अंगी लागतो जेव्हा आपण तो योग्य प्रमाणात खातो. आरोग्यदायी आहारात पोषक घटक असतातच, पण त्याचबरोबर त्यामध्ये कॅलरीजही असतात, हे विसरून चालणार नाही. मग अन्नपदार्थांचा फायदा मिळविण्याकरिता त्यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे.

जेवणानंतर पाचक चहा 

Advertisement

सणाच्या काळात चार पदार्थ जास्त केले जातात, त्यामुळे थोडे जास्त खाल जातच. याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो. यामुळे सुस्ती येणे, पित्त होणे अशा समस्या होण्याची शक्‍यता वाढते. हे टाळण्यासाठी आणि पचन व्यवस्थित होण्याकरिता जिंजर किंवा फायनल टी सेवन करणं फायद्याचं ठरतं. यामुळे पाचक एंजाइम्स सक्रिय होतात. पचन उत्तम होते.

दिवसाची सुरुवात घरीच बनवा 

पोषक घटकांनी समृद्ध असा नाश्ता केलात, तर तुमच्या चयापचयाच्या प्रक्रियेत सुधारणा होईल आणि अतिखाणं टाळणंही सहजशक्य होईल.

Advertisement

गोडाचे पदार्थ घरी बनवा 

घरी बनविलेले गोडाचे पदार्थ हे बाहेरच्या गोड पदार्थांपेक्षा खूप जास्त आरोग्यदायी असतात. शिवाय हे पदार्थ बनविताना त्यामध्ये कोणता घटक किती प्रमाणात घालायचा, यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. यामुळे वजन वाढण्याच्या प्रक्रियेस नियंत्रित करू शकतो.

जेवण टाळू नका 

Advertisement

जेवण किंवा नाश्ता टाळणं याचा अर्थ असा की, पुढच्या खाण्या दरम्यान अधिक खाणे. वेळच्या वेळी खाण्यामुळे अतिखाण्या पासून आपण नक्कीच बचाव करू शकतो.

गोड पदार्थ दुपारीच खा 

कोणतेही जड पदार्थ, गोड किंवा तळलेले पदार्थ हे शक्यतो दुपारीच खा. या काळात पचनशक्‍ती चांगली असते, चयापचयाचा वेग उत्तम असतो, त्यामुळे असे पदार्थ सहज पचतात.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker