म्युच्युअल फंडात गुंतवणूक आहे ? गुंतवणुकीचा विचार आहे ? तुमच्यासाठी आहे खुशखबर

MHLive24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्व खर्चांचे नियोजन करून शिल्लक राहणारी रक्कम म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवण्याचे प्रमाण वाढले आहे. आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने इंस्टंट अॅक्सेसची एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

म्युच्युअल फंडातील ओव्हरनाईट फंडांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडाच्या विविध प्रकारच्या योजना सुलभ करण्याचे सेबीचे उद्दीष्ट आहे जे त्यांच्या जटिलतेमुळे गुंतवणूकदारांना गोंधळात टाकतात.

सर्व योजना सेबीद्वारे नियंत्रित केल्या जातात आणि संस्था गुंतवणूकदारांना योजना समजून घेण्यास सक्षम असल्याचे आणि म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या विविध योजनांची तुलना करण्यास सक्षम असल्याचे सुनिश्चित करते.

Advertisement

वरील सुविधेअंतर्गत म्युच्युअल फंडातील ओव्हरनाईट फंडात गुंतवणूक केलेली काढून घ्यायची असेल म्हणजेच रिडिम्पशन रिक्वेस्ट द्यायची असेल तर काही तासात किंवा मिनिटांतच तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेऊ शकता. गुंतवणुकदार आपल्या म्युच्युअल फंड युनिटच्या मूल्याच्या ९० टक्क्यापर्यत पैसे काढू शकता.

म्युच्युअल फंडातून तात्काळ पैसे काढण्यासाठी ५०,००० रुपयांची मर्यादा आहे. सेबीने याचसंदर्भात २०१७ मध्ये दिलेल्या एका सर्क्युलरमध्ये सुधारणा केली आहे. याचबरोबर म्युच्युअल फंड कंपन्यांना ओव्हरनाईट फंडामध्ये तात्काळ व्यवहार करण्याची सुविधादेखील मंजूर केली आहे. सेबीचा नवा नियम तात्काळ लागू करण्यात आला आहे.

तात्काळ मिळतील पैसे :- ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने ओव्हरनाईट फंडाच्या श्रेणीला मंजूरी दिली होती. सर्वसाधारणपणे लिक्विड फंडासह इतर म्युच्युअल फंड योजनांमधून पैसे काढण्यासाठी १-२ कार्यालयीन दिवसांचा कालावधी लागतो. म्युच्युअल फंड गुंतवणुकदाराने रिडिम्पशनची रिक्वेस्ट दिल्यानंतर म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणुकदाराच्या बॅंक खात्यात पैसे जमा करते.

Advertisement

या प्रक्रियेसाठी १-२ कार्यालयीन कालावधी लागतो. मात्र आता सेबीने दिलेल्या नव्या आदेशामुळे गुंतवणुकदारांना नवी सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे गुंतवणुकदारांच्या बॅंक खात्यात लगेच पैसे जमा होणार आहेत.

क्लेम न केल्यास इतर फंडांकडे वळवली जाणार रक्कम :- १ सप्टेंबर २०२१पासून सेबी आणखी एक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. गुंतवणुकदारांची अशी रक्कम ज्यावर क्लेम करण्यात आलेला नाही, अशी गुंतवणूक आणि त्यावर मिळालेला लाभांश यांना म्युच्युअल फंडातीलच ओव्हरनाईट फंड, लिक्विड फंड आणि इतर योजनांमध्ये गुंतवण्याची परवानगी देणार आहे. याआधी या प्रकारच्या पैशांना कॉल मनी, लिक्विड आणि मनी मार्केटमधील योजनांमध्ये गुंतवण्यात येत होते. म्युच्युअल फंड कंपन्या अशा योजनांमध्ये एक्झिट लोडचे शुल्क आकारू शकत नाहीत.

सेबीने केले डीमॅट अकाउंटसंदर्भात काही बदल :- नवीन ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या नव्या बदलांनुसार डिमॅट खाते सुरू करण्यापूर्वी एक नॉमिनेश फॉर्म भरावा लागणार आहे. या नॉमिनेशन फॉर्मद्वारे गुंतवणुकदार कोणालाही नॉमिनी बनवू शकतो. जर गुंतवणुकदाराला नॉमिनी बनवायचा नसेल तर अशा परिस्थितीत त्याला एक डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागणार आहे. हा नियम १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होणार आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker