Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

क्रेडिट कार्ड वापरून शॉपिंग करण्याची आहे सवय ? मग ‘ह्या’ गोष्टी लक्षात ठेवाच

0 14

MHLive24 टीम, 05 जुलै 2021 :-  क्रेडिट कार्ड बँक आणि वित्तीय संस्था म्हणजेच बँक आणि एनबीएफसी द्वारे दिले जाते. क्रेडिट कार्डधारक credit card meaning marathi या संस्थांकडून क्रेडिट (पैसे) उधार घेतात किंवा वेगवेगळ्या सेवांसाठी पैसे देता येतात.

याव्यतिरिक्त क्रेडिट कार्ड रिवार्ड, कॅशबेक, व्याजमुक्त वेळेवर लोन मिळते असे अनेक फायदे आहेत . सध्याच्या पिढीच्या लोकांकडून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड या प्लॅस्टिक मनीचा मोठ्याप्रमाणावर वापर होताना दिसतो.

Advertisement

मात्र, क्रेडिट कार्डवरुन बिनधास्त शॉपिंग करताना काही गोष्टींचे भान बाळगणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जाणून घेऊयात त्या गोष्टी

पैसे येण्यापूर्वी होतात खर्च :- क्रेडिट कार्ड ही अशी सुविधा आहे की, तुमचे पैसे तुमच्या हातात येण्यापूर्वी खर्च होतात. अर्थात पैसे हातात नसले तरीही तुम्ही खर्च करू शकाल अशी प्रेरणा तुम्हाला क्रेडिट कार्डामधून मिळते. तुमच्या बँकेत कमी पैसे असतील, पण जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर, तुम्ही अगदी पैशांची चांगलीच उधळपट्टी करू शकता.

Advertisement

आपल्याकडे पैसे आहेत की, नाही हा विचार न करता तुम्ही आरामात क्रेडिट कार्डाच्या जीवावर एखादी वस्तू खरेदी करू शकता आणि करताही. त्यामुळे मग पगार येतो तेव्हा अर्ध्यापेक्षा अधिक पगार हा क्रेडिट कार्डावर खर्च करून घेतलेल्या वस्तूंचा इएमआय फेडण्यात जातो. त्यामुळे हातात पैसे नसतानाही पैशाची उधळपट्टी क्रेडिट कार्डामुळे होत असते हे मुळात लक्षात घ्यायला हवं.

ड्यू डेट फी :- तुम्ही क्रेडिट कार्डाचे बिल वेळेवर भरत असाल तर कोणतीही अडचण नाही. मात्र, दिलेल्या तारखेपर्यंत क्रेडिट कार्डाचे बिल न भरल्यास मोठी अडचण होऊ शकते. ड्यू डेट उलटून गेल्यानंतर पैसे भरायला गेल्यास त्यावर बराच दंड आकारला जातो. मासिक गणितावर दंडाची रक्कम ठरवली जाते. मात्र, वार्षिक गणिताच्या आधारे तुलना केल्यास तुमच्याकडून 30 टक्के दंड आकारला जातो.

Advertisement

डिजिटल वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचा चार्ज :- अनेकदा आपण पेटीएम किंवा अन्य एखाद्या डिजिटल वॉलेटमध्ये पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्डाचा वापर करतो. मात्र, या व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते.

पैसे काढल्यास चार्ज :-  क्रेडिट कार्डामधून तुम्ही पैसे काढू शकता. मात्र, त्यासाठी प्रचंड व्याज आकारले जाते. त्यामुळे क्रेडिट कार्डातून मोठी रक्कम काढताना नेहमीच काळजी बाळगणे गरजेचे आहे.

Advertisement

जीएसटी भरावा लागतो :- तुम्ही क्रेडिट कार्डसच्या सेवांचा वापर करता तेव्हा त्यावर जीएसटी लागतो. आगामी काळात क्रेडिट कार्डसंबधी सेवांवर 15 टक्के जीएसटी आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते.

नियमांकडे कानाडोळा करू नका :- तुम्ही ज्या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरत आहात, ते वापरण्यापूर्वी तुम्ही त्याचे नियम आणि अटी नीट वाचून घ्यायला हव्यात. त्याची सर्व योग्य माहिती तुम्हाला माहीत करून घ्यायला हवी.

Advertisement

तुम्हाला जर तुमच्या क्रेडिट कार्डाच्या नियमांसंबंधी माहिती नसेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल आणि त्यामुळे तुम्हाला खूप मोठं नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही तुमच्या कार्ड कंपनी आणि बँकेबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement