Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

जबरदस्त ! मोठे कुटुंब आहे? अवघ्या 4 लाखांत खरेदी करा ‘ही’ नवीकोरी 7 सीटर कार

0

MHLive24 टीम, 9 जून 2021 :- भारतातील ऑटो सेक्टरमध्ये, अलीकडील वर्षांमध्ये मोठा बदल झाला आहे ज्यामध्ये लोक आता बजेटमध्ये येणाऱ्या हॅचबॅक कारऐवजी मोठ्या 7-सीटर कार खरेदी करण्यास स्वारस्य दाखवत आहेत. या 7 सीटर सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात व्हरायटी आल्या आहेत कि ज्या बजेट मध्ये येतातच परंतु अनेक फीचर्स देखील यात येतात.

जर तुमचे कुटुंब खूप मोठे असेल आणि तुम्हाला 7 सीटर खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही 4 लाख रुपयांच्या आत 7 सीटर कार घरी आणू शकता. आज आम्ही जपानच्या अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी टैडसन बद्दल बोलत आहोत, ज्यांनी अलीकडेच 7 सीटर कार डॅटसन गो प्लस लॉन्च केली आहे. कंपनी 7 सीटर कार घेण्यासाठी कमी बजेट असणाऱ्या मोठ्या कुटुंबांना चांगली ऑफर देत आहे.

Advertisement

Datsun GO Plus च्या किंमतीबद्दल आणि त्यावर जाणाऱ्या ऑफर विषयी जाणण्याआधी हे जाणून घ्या की या कार मध्ये आपल्याला काय काय दिले जाते. Datsun GO Plus भारतातील सर्वात स्वस्त कार आहे. या कारमध्ये कंपनीने 3 सिलेंडर असणारे 1198 सीसी इंजिन दिले आहे जे 76.43 बीएचपी आणि 104 एनएम टॉर्क जनरेट करू शकते.

कारच्या फीचर्स बद्दल बोलाल तर यात पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, एबीएस, एसी, ड्युअल एअरबॅग, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेशन सिस्टम, जे ऍपल कंट्रोल आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट देते. जर कार मायलेजबद्दल बोललो तर ही कार एका लिटर पेट्रोलवर 19 .02 किमीपर्यंत एक मायलेज देते. या कारची प्रारंभिक किंमत 4.25 लाख रुपये आहे, टॉप मॉडेल 6.99 लाख पर्यंत जाते.

Advertisement

आता ही कार आपल्याला 4.25 लाखांऐवजी 3.85 लाख रुपयांत कशी मिळवू शकते हे जाणून घ्या. या कारवर 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट देत आहे, ज्यामध्ये 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस आहे. जे एकूण 40 हजार रुपये होते. आता या कारची प्रारंभिक किंमत 4.25 लाखांपैकी 40 हजार रुपयांनी कमी झाली आहे, कारची प्रारंभिक किंमत 3.85 लाख रुपये अशी होते.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement