Governments new rule : आता ‘ह्या’ लोकांना मिळणार नाही सिम, सरकारचा नवा नियम; तुम्ही तर यात नाहीत ना?

MHLive24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- मोबाईल ग्राहकांसाठी महत्वाची बातमी. सरकारने सिम कार्डसंदर्भात नवीन नियम बनवले आहेत. या नवीन नियमानुसार, काही ग्राहकांना नवीन मोबाईल कनेक्शन मिळवणे आणखी सोपे झाले आहे.(Governments new rule)

पण काही ग्राहक यापुढे नवीन सिम घेऊ शकणार नाहीत. आता ग्राहक आता नवीन मोबाईल कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि एवढेच नव्हे तर आता सिम कार्ड त्यांच्या घरी पोहचेल.

18 वर्षांखालील ग्राहकांना सिम मिळणार नाही

Advertisement

आता सरकारी नियमांनुसार, आता कंपनी 18 वर्षांखालील ग्राहकांना नवीन सिम विकू शकणार नाही. दुसरीकडे, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ग्राहक त्यांच्या नवीन सिमसाठी आधार किंवा डिजीलॉकरमध्ये साठवलेल्या कोणत्याही दस्तऐवजानुसार स्वतःची पडताळणी करू शकतात.

दूरसंचार विभागाने यासाठी आदेश जारी केला आहे. DoT चे हे पाऊल 15 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या दूरसंचार सुधारणांचा भाग आहे.

केवायसी 1 रुपयांत केले जाईल

Advertisement

जारी केलेल्या नवीन आदेशाच्या नियमांनुसार, वापरकर्त्यांना नवीन मोबाईल कनेक्शनसाठी यूआयडीएआयच्या आधार आधारित ई-केवायसी सेवेद्वारे प्रमाणपत्रासाठी फक्त 1 रुपये द्यावे लागतील.

या वापरकर्त्यांना नवीन सिम मिळणार नाही

दूरसंचार विभागाच्या नवीन नियमांनुसार, आता कंपनी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या वापरकर्त्यांना सिमकार्ड विकू शकणार नाही. या व्यतिरिक्त, जर एखादी व्यक्ती मानसिकरित्या आजारी असेल तर अशा व्यक्तीला नवीन सिमकार्ड दिले जाणार नाही. या नियमांचे उल्लंघन करून, जर सिम अशा व्यक्तीला विकली गेली, तर सिम विकलेली टेलिकॉम कंपनी दोषी मानली जाईल.

Advertisement

सरकारने कायद्यात सुधारणा केली

प्रीपेडला पोस्टपेडमध्ये रूपांतरित करण्यासाठी नवीन वन टाइम पासवर्ड (ओटीपी) आधारित प्रक्रियेसाठी सरकारने आदेश जारी केला आहे. नवीन मोबाईल कनेक्शन जारी करण्यासाठी आधार-आधारित ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने जुलै 2019 मध्ये भारतीय टेलिग्राफ कायदा, 1885 मध्ये सुधारणा केली होती.

ग्राहकांना सुविधा मिळतील

Advertisement

सध्या, ग्राहकांना नवीन मोबाईल कनेक्शनसाठी किंवा मोबाईल कनेक्शन प्रीपेड मधून पोस्टपेडमध्ये रूपांतरित करण्यासाठी केवायसी प्रक्रियेतून जावे लागते. यासाठी ग्राहकांना त्यांची ओळख आणि पत्ता पडताळणीची कागदपत्रे घेऊन दुकानात जावे लागते.

दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात ग्राहकांच्या सोयीसाठी आणि व्यवसायाच्या सुलभतेसाठी संपर्कविरहित सेवेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker