Government Scheme
Government Scheme

MHLive24 टीम, 18 मार्च 2022 :- Government Scheme : सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा भरपूर प्रसार देखील झाला आहे. दरम्यान नुकताच महिला दिन साजरा झाला. याबाबत आपण आज सरकारच्या महीलासाठी असणाऱ्या एका महत्वपूर्ण योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला तुमच्या पत्नीचे भविष्य असे घडवायचे असेल की, तीला भविष्यात पैशाची कसलीही समस्या येऊ नये तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. जर तुमची बायको 30 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची असेल तर तुम्ही हा फायदा घेऊ शकता. खूप कमी गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पत्नीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि उज्ज्वल करू शकता.

आम्ही ज्या योजनेबद्दल सांगत आहोत, त्यासाठी आगोदर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावाने नवीन पेन्शन सिस्टम खाते उघडावे लागेल. यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्हाला NPS एकरकमी रक्कम देईल आणि दर महिन्याला एक तगडी पेन्शन देखील खात्यात येईल. तुम्ही नवीन पेन्शन सिस्टम खात्यात सोयीनुसार दरमहा किंवा वार्षिक रक्कम जमा करू शकता.

तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर फक्त 1,000 रुपयांमध्ये NPS खाते उघडू शकता. NPS खाते वयाच्या 60 व्या वर्षी परिपक्व होते.

जर तुम्हाला वार्षिक गुंतवणुकीवर 10 टक्के परतावा मिळत असेल तर वयाच्या 60 व्या वर्षी त्याच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातून तुमच्या पत्नीला सुमारे 45 लाख रुपये सहज मिळतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक महिन्याला पत्नीला आयुष्यभर 45 हजार रुपये पेन्शन मिळत राहील.

किती पेन्शन मिळेल ?

वय – 30 वर्षे
गुंतवणुकीचा एकूण कालावधी – 30 वर्षे.
मासिक योगदान- रु. 5,000.
गुंतवणुकीवर अंदाजे परतावा – 10 टक्के.
एकूण पेन्शन फंड – रु 1,11,98,471 (मॅच्युरिटीवर काढता येईल)
अॅन्युइटी प्लॅन खरेदी करण्यासाठी रक्कम – रु 44,79,388/से
अंदाजे वार्षिकी दर 8% – रु. 67,19,083.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup