Government employees allowance increase: काय सांगता ! सरकारी नोकरदारांच्या आता पुन्हा वाढणार ‘हा’ भत्ता; 2.30 लाखांची वाढ होणार

MHLive24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- नवे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुखद वार्ता देणारे ठरले आहे. आता पुन्हा एक आनंदाची बातमी आली आहे. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार असल्याची माहिती आहे.(Government employees allowance increase)

नेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता किती वाढवला जाईल याचा निर्णय झालेला नाही. परंतु, AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, 3% DA वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणजे ती 34% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

नोकरदारांना नवीन वर्षात आनंदाची बातमी मिळेल!

Advertisement

डिसेंबर 2021 अखेर केंद्राच्या काही विभागांमध्ये पदोन्नती होणार आहे. याशिवाय, 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी फिटमेंट फॅक्टरबद्दल देखील चर्चा आहे, ज्यावर निर्णय येऊ शकतो. असे झाल्यास किमान पगारातही वाढ होईल. पण, सध्या महागाई भत्त्याबाबत AICPI इंडेक्सचा डेटा काय सांगतो, ये पाहुयात

AICPI डेटाद्वारे ठरवला जाईल DA

तज्ञांच्या मते, जानेवारी 2022 मध्येही महागाई भत्ता 3% ने वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच, जर 3% वाढ झाली तर एकूण DA 31% वरून 34% पर्यंत वाढू शकतो. AICPI डेटानुसार, सप्टेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी आता बाहेर आली आहे. त्यानुसार, महागाई भत्ता (DA) 32.81 टक्के आहे.

Advertisement

जून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 च्या महागाई भत्त्यात 31 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, आता त्याच्या पुढील आकडेवारीनुसार, महागाई भत्ता मोजला जाईल आणि त्यात चांगली वाढ दिसून येईल.

DA Calculator from July 2021

महीना                 गुणांक       DA टक्केवारी
जुलै 2021            353          31.81%
ऑगस्ट 2021       354          32.33%
सप्टेंबर 2021        355          32.81%
ऑक्टोबर 2021    –                –
नोव्हेंबर 2021      –                –
डिसेम्बर 2021     –                –

Advertisement

DA च्या गुणांकाची गणना

जुलैसाठी कॅल्क्युलेशन – 122.8X 2.88 = 353.664
ऑगस्ट साठी कॅल्क्युलेशन- 123X 2.88 = 354.24
सप्टेंबर साठी कॅल्क्युलेशन- 123.3X 2.88 = 355.104

34% DA वरील कॅल्क्युलेशन

Advertisement

महागाई भत्ता 3% ने वाढवल्यानंतर एकूण DA 34% होईल. आता 18,000 रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता 73,440 रुपये असेल. पण फरकाबद्दल बोलायचे झाले तर पगारात वार्षिक 6,480 रुपये वाढ होणार आहे.

न्यूनतम बेसिक पगाराचे कॅल्क्युलेशन

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000
2. नवीन महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (31%) रु.5580/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला 6120- 5580 = रु 540/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 540X12 = रु. 6,480

Advertisement

अधिकतम बेसिक पगाराचे कॅल्क्युलेशन

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु 56900
2. नवीन महागाई भत्ता (34%) रुपये 19346/महिना
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (31%) रु 17639/महिना
4. 19346-17639 ने किती महागाई भत्ता वाढला रु 1,707/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 1,707 X12 = रु. 20,484

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker