Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

खुशखबर ! हीरोची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 15000 रुपयांनी झाली स्वस्त

0 93

MHLive24 टीम, 10 जुलै 2021 :-  येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचा असेल असा विश्वास आहे. दुचाकी स्कूटर-बाईक असो किंवा कार सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे खूप लक्ष दिले जात आहे. यासाठी सरकारने अनुदानासारख्या बर्‍याच घोषणा केल्या आहेत.

लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी थेट या अनुदानाचा लाभ दिला आहे. बर्‍याच कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीही कमी केल्या आहेत. यात हिरो इलेक्ट्रिकचा समावेश आहे. हीरो इलेक्ट्रिकची गणना देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांमध्ये केली जात आहे.

Advertisement

इलेक्ट्रिक स्कूटर किती स्वस्त झाली ? :- फेम -II इंसेंटिव मध्ये सुधारणा केल्यांनतर हिरो इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरच्या किंमती 15,600 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. यासह, त्याच्या ऑप्टिमा एचएक्स ड्युअल-बॅटरी वेरियंटची किंमत आता एक्स-शोरूम (भारत) 58,990 रुपये आहे. त्याचबरोबर या स्कूटरचा सिंगल बॅटरी वेरियंट सध्या 53600 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. विद्युत वाहने पर्यावरणासाठीदेखील अधिक चांगली मानली जातात.

कोण कोणत्या कंपनीने किंमत कमी केल्या आहेत :- फेम -II इंसेंटिव मध्ये सुधारणा केल्यांनतर हीरो इलेक्ट्रिक व्यतिरिक्त, अनेक कंपन्यांनी त्यांचे स्कूटर स्वस्त केले आहेत. यात अथर, टीव्हीएस आणि ओकिनावा यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती कमी केल्या आहेत.

Advertisement

सरकारने भारतात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी वाढवलेल्या प्रोत्साहनानुसार, इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटरी पॅकसाठी अनुदान आता 10,000 रुपये प्रति किलोवॅट पासून 50 टक्क्यांनी वाढवून 15,000 रुपये प्रति किलोवॅट करण्यात आले आहे.

ओकिनावा स्कूटर किंमती :- हीरो व्यतिरिक्त ओकिनावा स्कूटर्सच्या नवीन किंमतींचा आढावा घेतला तर यात आईप्रेज+ ची किंमत 1,17600 रुपयांवरून 17,892 रुपयांनि कमी होऊन 99708 रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या प्रेज प्रो ची किंमत 84795 रुपयांवरून 7947 रुपयांनि कमी होऊन 76848 रुपयांवर आली आहे. शेवटी, जर आपण रिज + बद्दल चर्चा केली तर त्याची किंमत 69000 रुपयांवरून 7203 रुपयांरुपयांनि कमी होऊन ती 61791 रुपयांवर आली आहे.

Advertisement

अँपिअरने किंमत किती कमी केली :- अ‍ॅम्पीयरच्या किंमतीत घट झाल्यानंतर आता त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरची गुजरातमध्ये किंमत 50,000 पेक्षा कमी आहे. अँपिअर मॅग्नस आता गुजरातमध्ये, 47,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर ज़ील ची किंमत आता 41,990 रुपये आहे. पण या किंमती गुजरातच्या एक्स-शोरूममधील आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement