Good news from this bank : ‘ह्या’ मोठ्या बॅँकेकडून खुशखबर! गृह आणि कार कर्ज तब्बल ‘इतके’ झाले स्वस्त

MHLive24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- बँक ऑफ महाराष्ट्रने ‘रिटेल बोनान्झा – फेस्टिव्ह धमाका’ ऑफर जाहीर केला आहे. या ऑफर अंतर्गत बँकेने गृहकर्ज आणि कार कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे.(Good news from this bank)

बँकेने गृहकर्जाचा व्याजदर 6.80 टक्क्यांवरून 6.40टक्के केला आहे. त्याचप्रमाणे, कार कर्जावरील व्याजदर देखील 7.05 टक्क्यांवरून 6.80 टक्के करण्यात आला आहे. BoM ने एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन दर 13 डिसेंबरपासून लागू झाले आहेत.

बँक काय म्हणतेय ?

Advertisement

बँकेचे म्हणणे आहे की ‘रिटेल बोनान्झा – फेस्टिव्ह धमाका’ अंतर्गत ऑफर केलेले दर कर्जदारांच्या क्रेडिट स्कोअरशी जोडलेले आहेत, याचा अर्थ त्याचा फायदा घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक आहे. बँकेने सोने, गृह आणि कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क आधीच माफ केले आहे.

एएस राजीव, व्यवस्थापकीय संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की ‘रिटेल बोनान्झा – फेस्टिव्ह धमाका’ ऑफर ग्राहकांना त्यांच्या कर्जावर अधिक बचत करण्यास आणि त्यांच्या जीवनात आनंद आणण्यास मदत करेल.” BoM चे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा म्हणाले की, बँक आपल्या ग्राहकांना इंडस्ट्री मधील सर्वात स्वस्त गृह कर्ज आणि कार कर्ज देत आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker