Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

तरुणांना खुशखबर: ISRO मध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती…

0 5

MHLive24 टीम, 04 जुलै 2021 :- इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरने (एलपीएससी) पदवीधर आणि पदविका अ‍ॅप्रेंटिस या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

या भरती मोहिमेच्या माध्यमातून 160 पदे भरती केली जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवार lpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Advertisement

एकूण पद संख्या – 160 पद

पद संख्या

Advertisement
  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस 73
  • डिप्लोमा अप्रेंटिस 87

योग्यता :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

महत्त्वाच्या तारखा

Advertisement
  • अर्ज करण्याची प्रारंभ तारीख – 30 जून
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 जुलै

निवड प्रक्रिया :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी चाचणी व मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज फी :- या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.

Advertisement

या प्रमाणे अर्ज करा :- इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट lpsc.gov.in वर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत सूचना पाहू शकता.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement