Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

नोकरदार वर्गास खुशखबर! कोरोनाने मृत्यू ओढवल्यास आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांना मिळणार पेन्शन

0 646

MHLive24 टीम, 23 जुलै 2021 :- भारतीय राज्य कामगार विमा योजना (ईएसआयसी)ही कामगार वर्गाला सामाजिक आर्थिक सुरक्षितता पुरविण्यासाठी तयार केलेली बहुमुखी सामाजिक सुरक्षितता प्रणाली असून त्या अंतर्गत त्यांचे अवलंबित सुद्धा समाविष्ट आहेत.

कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण वैद्यकीय देखभाली बरोबरच विमाधारक व्यक्तीचे आजारपण, तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व, इत्यादीमुळे कमाईच्या क्षमतेत झालेली घट व विमाधारक महिला विविध तऱ्हेचे रोख लाभ मिळण्यास पात्र असतात.

Advertisement

औद्योगिक अपघात किंवा सेवेतील इजेमुळे किंवा व्यावसायिक जोखीमिमुळे मृत्यू पावणाऱ्या विमा धारक व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना अवलंबित्व लाभ नावाने दरमहा निवृत्ती वेतन दिले जाते.

राज्य विमा योजनेचे वैशिष्ट्य असे की त्यातील अंशदान हे वर्गणीदाराच्या क्षमतेवर अवलंबून कामगारांना देय असणाऱ्या वेतनाची ठराविक टक्केवारीच्या स्वरुपात असते तर मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ हा प्रत्येकाच्या गरजेनुसार कोणताही भेदभाव न करता दिला जातो.

Advertisement

अलीकडेच सरकारने ईएसआयसी पेन्शनबाबतचे नियम बदलले होते. जर एखाद्या कामगाराचा मृत्यू कोरोनामुळे झाला आणि तो ईएसआयसीच्या कक्षेत आला तर त्याला ईएसआयसी पेन्शनचा लाभ मिळेल, असंही कामगार मंत्रालयाच्या वतीने सांगितले गेले, यासह काही अटी देखील समाविष्ट केल्यात. या नियमांबद्दल जाणून घेऊयात.

नवीन नियम 24 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला :- कोरोना संकटाच्या वेळी जे लोक ईएसआयसी योजनेंतर्गत जोडले गेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याच्या उद्देशाने हा त्वरित बदल नियमात करण्यात आलाय. नवीन नियम 24 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला आणि पुढील दोन वर्षांसाठी म्हणजे 24 मार्च 2022 पर्यंत लागू असेल. ईएसआयसी पेन्शनचा लाभ घेण्यापूर्वी आम्हाला आवश्यक अटींबद्दल माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

Advertisement

विमाधारकाच्या मृत्यूचे एक वर्ष आधीचे योगदान कमीत कमी 78 दिवस असावे :- प्रथम पात्रतेच्या अटीनुसार, ईएसआयसी पोर्टलवर विमा काढलेल्या व्यक्तीची (आयपी) नोंदणी कोविड शोधण्यापूर्वी कमीत कमी तीन महिने आधी झाली पाहिजे. दुसरी अट अशी आहे की, विमाधारकाच्या मृत्यूचे एक वर्ष आधीचे योगदान कमीत कमी 78 दिवस असले पाहिजे. जर दोन्ही अटी पूर्ण झाल्या तर पीडित कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळेल.

तुम्हाला किती पेन्शन मिळेल? :- ESIC Pension योजनेंतर्गत रोजंदारीच्या सरासरी 90 टक्के वेतन पेन्शन म्हणून मिळणार आहे. जर एखाद्या कामगारांचे सरासरी वेतन 20 हजार रुपये असेल तर त्याच्या कुटुंबास पेन्शन व सहाय्य म्हणून दरमहा एकूण 18000 रुपये मिळतील.

Advertisement

सरासरी वेतन काढण्याचा नियमही देण्यात आलाय. प्रत्येक आर्थिक वर्षात दोन योगदान कालावधी असतात. प्रथम योगदानाचा कालावधी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत योगदानाचा दुसरा कालावधी आहे.

एप्रिल ते सप्टेंबरच्या योगदानाच्या कालावधीसाठी येत्या वर्षाच्या जानेवारी ते जून या कालावधीस लाभाचा कालावधी म्हणतात. त्याचप्रमाणे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत त्या वर्षाच्या जुलै ते डिसेंबर या कालावधीला लाभ कालावधी म्हणतात. आयपीसाठी शेवटच्या योगदान कालावधीचा सरासरी पगार पेन्शनचा आधार असेल.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement