Good news for government employees :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता आणखी एक खुशखबर ! ‘ती’ वाढ ३१% वरून ३४% वर; किती मिळणार पगार? पहा कॅल्क्युलेशन

MHLive24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागील काही दिवसांत पगाराच्या बाबतीत अनेक खुशखबर मिळाल्या आहेत. आता आणखी एक खुशखबर आहे. नवीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या पैशांत घसघशीत वाढ होणार आहे. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार आहे.(Good news for government employees)

डीए वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा वाढ होणार आहे. तथापि, जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता किती वाढणार हे निश्चित करण्यात आलेले नाही. परंतु, AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, 3% DA वाढण्याची अपेक्षा आहे.

नोकरदारांना नवीन वर्षात आनंदाची बातमी मिळेल!

Advertisement

डिसेंबर 2021 अखेर केंद्राच्या काही विभागांमध्ये पदोन्नती होणार आहे. याशिवाय, 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी फिटमेंट फॅक्टरबद्दल देखील चर्चा आहे, ज्यावर निर्णय येऊ शकतो. असे झाल्यास किमान पगारातही वाढ होईल. पण, सध्या महागाई भत्त्याबाबत AICPI इंडेक्सचा डेटा काय सांगतो, ते आपण पाहुयात

AICPI डेटाद्वारे ठरवला जाईल DA

तज्ञांच्या मते, जानेवारी 2022 मध्येही महागाई भत्त्यात 3% वाढ केली जाऊ शकते. म्हणजेच, जर 3% वाढ झाली तर एकूण DA 31% वरून 34% पर्यंत वाढू शकतो. AICPI डेटानुसार, सप्टेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी आता बाहेर आली आहे. त्यानुसार, महागाई भत्ता (DA) 32.81 टक्के आहे.

Advertisement

जून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 च्या महागाई भत्त्यात 31 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, आता त्याच्या पुढील आकडेवारीनुसार, महागाई भत्ता मोजला जाईल आणि त्यात चांगली वाढ दिसून येईल.

DA Calculator from July 2021

महीना               अंक           DA टक्केवारी
जुलै २०२१          ३५३           ३१.८१%
ऑगस्ट २०२१      ३५४          ३२.३३%
सप्टेंबर २०२१       ३५५          ३२.८१%
ऑक्टोबर २०२१   –               –
नोव्हेंबर २०२१     –               –
डिसेंबर २०२१     –                –

Advertisement

DA ची गणना

जुलै साठी कॅल्क्युलेशन – 122.8* 2.88 = 353.664
ऑगस्ट साठी कॅल्क्युलेशन- 123* 2.88 = 354.24
सप्टेंबर साठी कॅल्क्युलेशन- 123.3* 2.88 = 355.104

डीए 3 टक्क्यांनी वाढेल

Advertisement

जर आपण AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, सप्टेंबर 2021 पर्यंत, महागाई भत्ता 33 टक्क्यांवर गेला आहे. म्हणजेच त्यात 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यात आणखी 1 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

डिसेंबर 2021 पर्यंत CPI (IW) चा आकडा 125 पर्यंत राहिला, तर महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ निश्चित आहे. म्हणजेच एकूण DA 3% वाढेल म्हणजे तो 34% वाढेल. जानेवारी 2022 पासून ते दिले जाणार असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker