‘ह्या’ महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! प्रत्येक महिन्याला मिळणार दोन दिवसांची पीरियड लीव

MHLive24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या महिला फूड डिलिव्हरी पार्टनरसाठी एक अनोखा पुढाकार घेतला आहे. स्विगीने महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून दोन दिवस पीरियड लीव देण्याची घोषणा केली आहे.(Good news for female employees)

कंपनीने आपल्या महिला डिलीवरी पार्टनर्ससाठी ‘नो-क्वेश्चन-आस्कड, टू-डे पेड मंथली पीरियड टाइम ऑफ पॉलिसी’ चा पर्याय दिला असल्याचे म्हटले आहे. कंपनीनेच याबाबत माहिती दिली आहे.

स्विगीचा अनोखा उपक्रम!

Advertisement

स्विगी ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष मिहीर शाह यांनी नुकतेच एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मासिक पाळीच्या काळात डिलीवरी साठी एखाद्या व्यक्तीकडे जाणे त्रासदायक आहे आणि यामुळेच महिला या क्षेत्रात काम करण्यासाठी पुढे येत नाहीत.

महिलांना त्यांच्या मासिक पाळीशी संबंधित समस्यांदरम्यान पाठिंबा देण्याच्या उद्देशाने, आम्ही कोणतेही प्रश्न न विचारता दर महिन्याला दोन दिवस महिला डिलीवरी एजंटांना पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला डिलीवरी पार्टनर्ससाठी ‘सेफ झोन’

Advertisement

2016 मध्ये पहिली महिला कर्मचारी डिलिव्हरी एजंट म्हणून स्विगीमध्ये सामील झाली होती. कंपनीने महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक रजेव्यतिरिक्त अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शाह यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये असेही नमूद केले आहे की स्विगीने महिला डिलीवरी पार्टनर्ससाठी ‘सेफ झोन’ आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच डिलीवरी वेळ यासारखी पावले उचलली आहेत.

Zomato ने ही घोषणा केली आहे

गेल्या वर्षी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने देखील या कालावधीत आपल्या महिला कर्मचार्‍यांसाठी वर्षातून 10 पगारी रजा सुरू केली होती. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना कामात सातत्य राखण्यास मदत होईल.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker