Good news for farmers : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! किसान सन्मान योजनेच्या 10 व्या हप्त्यासोबत तुम्हाला मिळतील ‘हे’ बंपर फायदे

MHLive24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- ‘पीएम किसान सन्मान निधी योजना’ ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.(Good news for farmers)

सध्याच्या घडीला या योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांप्रमाणे वर्षभरात 3 हप्ते जमा करते. म्हणजे वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत त्याचे 9 हप्ते म्हणजेच 18,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत.

किसान योजनेंतर्गत अनेक फायदे मिळतील

Advertisement

पीएम किसान योजनेअंतर्गत आता सरकार शेतकऱ्यांना इतरही अनेक फायदे देत आहे. वार्षिक 3 हप्त्यांव्यतिरिक्त आता शेतकरी ‘पीएम किसान मानधन योजना’ चाही लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी आणि वृद्धापकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने ‘पीएम किसान मानधन योजना’ ही पेन्शन सुविधाही सुरू केली आहे.

यासोबतच शेतकरी क्रेडिट कार्डवरून कर्जाचा लाभ घेऊ शकतात. पीएम किसान योजनेच्या डेटाच्या आधारे सरकार शेतकऱ्यांसाठी युनिक फार्मर आयडी तयार करण्याची तयारी करत आहे.

1. किसान क्रेडिट कार्ड

Advertisement

केंद्र सरकारने आपल्या सर्वात महत्वाकांक्षी योजनेचा 9वा हप्ता जारी केला आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच मिळत नाही, तर सरकार स्वस्त दरात कर्जही उपलब्ध करून देते.

वास्तविक, पीएम किसान सन्मान योजना आणि किसान क्रेडिट कार्ड योजना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जोडल्या गेल्या आहेत. या किसान क्रेडिट कार्ड योजनेवर सरकार शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देत आहे.

2. पीएम किसान मानधन योजना

Advertisement

पीएम किसान अंतर्गत, मानधन योजनेत शेतकर्‍यांना पेन्शनचीही सुविधा आहे. जर तुम्ही पीएम किसान मध्ये खातेदार असाल तर तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाही. तुमची थेट नोंदणी पीएम किसान मानधन योजनेतही केली जाईल. या योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेऊ या.

पीएम किसान मानधन योजनेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या अंतर्गत शेतकऱ्याला किमान मासिक 3000 रुपये पेन्शन मिळते. पीएम किसान मानधनमध्ये फॅमिली पेन्शनचीही तरतूद आहे. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला 50 टक्के पेन्शन मिळेल.

3. किसान कार्ड तयार करण्याची तयारी

Advertisement

केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या डेटाच्या आधारे शेतकऱ्यांसाठी युनिक फार्मर आयडी तयार करण्याच्या तयारीत आहे. पीएम किसान आणि राज्यांच्या वतीने हे विशेष ओळखपत्र भूमी अभिलेख डेटाबेसशी लिंक करून बनवण्याची योजना आहे. हे कार्ड तयार झाल्यानंतर शेतीशी संबंधित योजना शेतकऱ्यांपर्यंत सहज पोहोचतील.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker