Railway Recruitment 2021: दहावी पास असणाऱ्यांसाठी खुशखबर; रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी

MHLive24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने मोठी भरती काढली आहे. यामध्ये 3093 पदांवर भरती केली जाणार आहे.( Railway Recruitment 2021)

फक्त दहावी पास उमेदवार देखील नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात. उमेदवार rrcnr.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे.

शैक्षणिक पात्रता 

Advertisement

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार अधिसूचनेमध्ये वयोमर्यादेसह इतर विहित पात्रतांची माहिती तपासू शकतात.

महत्वाच्या तारखा 

अर्ज करण्याची तारीख : 20 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2021

Advertisement

इच्छुक उमेदवार 20 ऑक्टोबरपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला rrcnr.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या माहितीसह नोंदणी करावी लागेल.

दहावीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये अॅप्रेंटिसशिप दरम्यान उपलब्ध असलेल्या स्टायपेंडसह इतर सुविधांची माहिती तपासू शकतील.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker