Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

बारावी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी: इंडियन एयरफोर्समध्ये मोठी भरती, वाचा सविस्तर…

0 11

MHLive24 टीम, 26 जून 2021 :- भारतीय एअरफोर्सने एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) 2021 ची शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रांच आणि ग्राऊंड ड्यूटी (तांत्रिक व नॉन-टेक्निकल) एकूण 334 पदे भरती करण्यात येणार आहेत.

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 जूनपर्यंत  careerindianairforce.cdac.in आणि  afcat.cdac.in वर ऑनलाईन अर्ज करु शकतात. या भरतीतून ही पदे भरली जातील.

Advertisement

पात्रता :- अर्ज केलेल्या उमेदवारांनी 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, 12 वी मध्ये गणित-भौतिकशास्त्र विषय असणे आवश्यक. पोस्टनिहाय पात्रतेविषयी सविस्तर माहितीसाठी आपण ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता.

वयोमर्यादा  

Advertisement
  • फ्लाइंग ब्रांच- या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार वयाचे वय 20 ते 24 वर्षे असावे.
  • ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल अँड नॉन टेक्निकल) – यासाठी अर्जदाराचे वय 20 ते 26 पर्यंत निश्चित केले गेले आहे.

सिलेक्शन प्रोसेस :- अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीसाठी ऑनलाइन AFCAT परीक्षा असेल. त्याचबरोबर ग्राऊंड ड्यूटी (टेक्निकल) शाखेच्या उमेदवारांनाही अभियांत्रिकी नॉलेज टेस्टही द्यावी लागेल. AFCAT आणि AFSB या दोन्ही परीक्षांच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता काढली जाईल.

परीक्षा पॅटर्न :- 2 तास 45 मिनिटांच्या या चाचणीत एकूण 100 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न जनरल अवेयरनेस, वर्बल एबिलिटी इन इंग्लिश, न्यूमेरिकल एबिलिटी, रीजनिंग, मिलिट्री एप्टीड्यूड यांचे असतील. पेपर 300 गुणांचा असेल.

Advertisement

अर्ज फी

  • जनरल – 250 रुपये
  • एनसीसी विशेष प्रवेश – फी नाही
  • मेट्रोलॉजी प्रवेश – फी नाही

असा करा अर्ज :- इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी  https://careerindianairforce.cdac.in किंवा  https://afcat.cdac.in मार्फत नियोजित तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement