Gmail’s new feature : व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी आता Gmail ने आणले ‘हे’ फीचर, रिचार्ज नसतानाही करू शकाल कॉल

MHLive24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- आजकाल व्हॉट्सअॅप हे अत्यंत लोकप्रिय मेसेजिंग ऍप बनले आहे. इन्स्टंट मेसेजिंगच्या दुनियेत व्हॉट्सअॅपचे वर्चस्व कायम आहे आणि अनेक कंपन्या त्याला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत.(Gmail’s new feature)

याच पार्श्वभूमीवर गुगलने आपल्या ‘जीमेल’ या लोकप्रिय सुविधेमध्ये नवीन फीचर्स समाविष्ट केले आहेत. या फीचरच्या मदतीने यूजर्स गुगल चॅट व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करू शकतात. यासाठी वेगळे अॅप इन्स्टॉल करण्याची गरज नाही.

Gmail वरील हे नवीन फिचर इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप्ससारखीच आहेत. यावर गुगलने म्हटले आहे की, हे अपडेट आल्यानंतर यूजर्स केवळ अॅपच्या मदतीने व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करू शकतात.

Advertisement

परंतु कॉलिंगसाठी, दोन्ही युजर्सने नवीनतम व्हर्जन वापरत असणे हे देखील आवश्यक आहे. इंटरनेट असेल पण तुमचा रिचार्ज संपला असेल तरीही तुम्ही कॉल करू शकाल.

MacRumors च्या रिपोर्टनुसार, Android आणि iOS दोन्ही यूजर्स हे फीचर वापरू शकतील. यासाठी जीमेल अॅप ओपन करावे लागेल. यानंतर, तुम्हाला चॅट्स टॅबवर क्लिक करावे लागेल. हे फिचर Google Workspace युजर्ससाठी बाय डीफॉल्ट एनेबल केले जाईल.

तुम्ही ते याप्रमाणे वापरू शकता: कॉलिंग फीचरसाठी, आता फोन आणि व्हिडिओ आयकॉन Google चॅटमध्ये सर्वात वर दिसू लागतील. कॉल करण्यासाठी, वापरकर्त्यांना या आयकॉनवर टॅप करावे लागेल. जीमेल कॉलबद्दल निळ्या बॅनरद्वारे सांगेल, जे स्क्रीनच्या टॉपवर असेल. हे व्यक्तीचे नाव आणि कॉलचा कालावधी देखील दर्शवेल.

Advertisement

तुम्ही मिस्ड कॉल देखील पाहू शकाल: अशा परिस्थितीत, जर यूजर्स व्हिडिओ किंवा व्हॉईस कॉल मिस करत असतील तर ते आयकॉन लाल रंगात दिसायला सुरुवात होईल. नवीन कॉलिंग फीचर व्यक्तिगत गूगल अकाउंट्स असलेल्या सर्व वापरकर्त्यांसाठी तसेच Google Workspace, G Suite बेसिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी आणले जात आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker