Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

आठवड्याची सकारात्मक सुरुवात जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी

0

MHLive24 टीम, 8 जून 2021 :- मागील आठवड्यातील वृद्धी बेंचमार्क निर्देशांकांनी कायम ठेवली. निर्देशांकांनी एसजीएक्स निफ्टीच्या संकेतानुसारच सकारात्मक स्थितीत आठवड्याची सुरुवात केली. 

एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की निफ्टीने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. यातून बाजारात बुल्स सक्रिय असल्याचे दिसून आले. निर्देशांकाने मागील १५७३३ ची पातळी मोडत सलग तिसऱ्या सत्रात सर्वोच्च पातळी गाठली.

Advertisement

मार्केटमधील घडामोडी:- ब्रॉडर मार्केटमध्ये पुन्हा एकदा बेंचमार्कमध्ये सर्वाधिक कामगिरी केली. मिडकॅप इंडेक्स सलग चौथ्या सत्रात उच्चांकी स्थितीत स्थिरावला. तर स्मॉल कॅपदेखील उच्चांकी स्थानावर राहिला. सेक्टरनिहाय कामगिरी पाहता, निफ्टी एनर्जी इंडेक्स दिवसभरातील टॉप गेनर ठरला. यात जवळपास २ टक्क्यांची वृद्धी झाली.

इन्फ्रा, मीडिया आणि आयटी इंडेक्सनी या सर्वांनी १ टक्क्यांपेक्षा जास्त वृद्धी अनुभवली. स्टॉक्सबाबतीत विचार करता, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड आणि एनटीपीस हे टॉप गेनर्स ठरले. तर बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह तसेच एचडीएफसी हे निफ्टी ५० स्टॉक्सपैकी टॉप लूझर्समध्ये समाविष्ट झाले.

Advertisement

बातम्यांतील स्टॉक्स:- आजच्या बातम्यांतील स्टॉक म्हणजे टीव्हीएस मोटर. स्टॉकने ४ टक्क्यांपेक्षा जास्त इंट्रा डे नफा कमावला. सुंदरम क्लेटॉन या टीव्हीएस ग्रुप कंपनीत उच्चांकी व्हॉल्युम वृद्धी दिसून आली. ब्लॉक डीलमध्ये कंपनीतील ५ टक्के स्टेक विकले जाण्याची शक्यता आहे.

दुसरा एक स्टॉक म्हणजे बजाज फायनान्स. याचे स्टॉक ४ टक्क्यांपेक्षा जास्त पडले. कंपनीने मिड-क्वार्टर अपडेट जाहीर केले. वित्तवर्ष २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत कोव्हिड विरोधी लॉकडाऊनमुळे कंपनीला जास्त थकबाकींचा सामना करावा लागू शकतो, असे त्यात म्हटले आहे.

Advertisement

जागतिक आकडेवारी आघाडी:- शुक्रवारी, जागतिक आघाडीवर, अमेरिकेतील प्रमुख घटक सकारात्मक स्थितीत दिसले. त्या आठवड्यात काहीसा नफा कमावला. मे महिन्यात रोजगार वृद्धी झाल्याने लेबर डिपार्टमेंटने जाहीर केले, त्यानंतर वॉल स्ट्रीटमध्ये सुरुवातीला बळकटी मिळाली.

नॉन फार्म पेरोल एम्प्लॉयमेंटमध्ये मे महिन्यात ५,५९,००० ची वृद्धी झाली. एप्रिलमध्ये ही वृद्धी २७८,००० एवढी नोंदली गेली. तर युरोपियन निर्देशांकांनी सकारात्मक स्थितीत व्यापार केला. डीएएक्स आणि सीएसी ४० ने सर्वोच्च पातळी गाठली.

Advertisement

तात्पर्य असे की, सोमवारी बेंचमार्क निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्सने विक्रमी स्थिती गाठली. कारण इंडिया व्हीआयएक्समध्ये घट दिसली. सध्या तो १६ पातळीच्या निम्नस्थितीत आहे. सेन्सेक्सने २२८ अंक किंवा ०.४४ टक्क्यांची वृद्धी घेतली व तो ५२,३२८ अंकांवर स्थिरावला.

तर निफ्टीने ८१ अंक किंवा ०.५२ टक्क्यांची वाढ घेऊन तो १५,७५१ अंकांवर स्थिरावला. निफ्टीच्या नफ्यातील लेव्हल उच्चांकी स्थितीकडे १५,८५० आणि डाऊनसाइडला १५५०० पर्यंत, यावर लक्ष ठेवावे लागणार.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement