Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

‘ह्या’ व्यवसायातून घरबसल्या महिला करू शकतात बक्कळ कमाई

0 25

MHLive24 टीम, 13 जुलै 2021 :- अनेक व्यवसाय असे आहेत जे कोणतीही महिला तिच्या घरातून करू शकते आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकते. दररोजच्या कामामधून अगदी थोडा वेळ काढून आणि थोडे प्रयत्न केल्यास कोणतीही महिला अगदी सहजतेने हे व्यवसाय करू शकते. त्यातील एक म्हणजे केक बनवणे.

आता केक बनविण्याच्या असंख्य रेसिपी आल्याने तसेच बेकिंग उपकरणे आणि केक बनवण्याच्या सोप्या पद्धती मुळे केक अगदी कोणीही बनवू शकतो. या लेखामध्ये आपण केक व्यवसायातील संधी आणि बनवण्याच्या पद्धती आणि साहित्य याविषयी माहिती घेणार आहोत.

Advertisement

केक आणि बेकरी च्या उत्पादनांची मागणी सतत वाढत आहे. वाढदिवसाचे कार्यक्रम असले की केक अति आवश्यक असतो तुम्हाला फक्त पिठात प्रयोग करायला आवडत असेल, तर बेकरीचा व्यवसाय सहजपणे घरीच सुरू केला जाऊ शकतो.

आपला व्यवसाय रोलिंगमध्ये आणण्यासाठी फक्त आवश्यक असलेले थोडेफार कौशल्य आणि उपकरणांमध्ये थोडीफार गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महिलांसाठी हा उद्योग अतिउत्तम ठरू शकतो. तुम्ही केक कसा बनवायचा या साठी यूट्यूब चा आधार घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुठ शिकायला जाण्याची सुद्धा गरज नाही.

Advertisement

केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- मैदा 25%, साखर 20%, मिल्क प्रोटीन 9.96 टक्के, पाणी 28%, पामतेल सात टक्के, व्हॅनिला इसेन्स 0.12 टक्के, बेकिंग पावडर आठ टक्के, बेकिंग सोडा 0.12 टक्के, सोर्बीक आमल 1., मीठ 0.5 टक्के याप्रमाणे मिश्रण करून घ्यावे.

केक बनवण्याची पद्धत :- सगळ्यात आगोदर मैदा शिफ्टर मधून चाळून घ्यावा.वरील सर्व साहित्य चार ते पाच मिनिटे एकत्र मिसळून या मिश्रणाला दोन ते तीन वेळा चाळून घ्यावे. हे सगळ्या प्रकारचे तयार झालेले मिश्रण केकच्या साच्यामध्ये टाकावे.

Advertisement

बेकिंग साठी बेकरी ओव्हनमध्ये 170 अंश सेल्सिअस तापमानाला 25 मिनिटे ठेवावे. नंतर हे मिश्रण बाहेर काढून सामान्य तापमानात थंड करावे. त्यानंतर हे मिश्रण साच्यांमध्ये बाहेर काढून त्याचे काप करावेत. या सगळ्यांचा स्पॉन्ज तयार झाल्यानंत त्यावर शिरफ स्प्रे करावे.

नंतर त्यावर क्रीम चा थर द्यावा. तयार झालेल्या केकचा सुगंधित क्रीमने सजावट करून त्याची साठवणूक चार अंश सेल्सिअस तापमानात करावी. व मागणीनुसार बाजारात विक्री साठी पाठवा.

Advertisement

केक विक्री व्यवसाय वाढवण्यासाठी टिप्स :- त्याचे विविध प्रकार आणि वेगळ्या पद्धती असतात, त्या पद्धती शिकून घेऊन स्वतःचे केक शॉप चालू करता येते. स्वच्छतेचे सर्व निकष पाळून आणि केक ची चांगली गुणवत्ता देऊन ग्राहकांना आकर्षित करता येऊ शकते.

जर या व्यवसायामध्ये जम बसला सर केकचा स्वतःचा ब्रँड तयार करता येऊ शकतो. आणि जर आपण निर्माण केलेला ब्रँड लोकप्रिय झाला तर विविध ठिकाणांचा अभ्यास करून आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन वेगवेगळ्या शहरात स्वतःची फ्रॅंचाईजी सुरू करता येते.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit