Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

धास्ती कोरोनाची : आता घरात एकत्र जेवण्यावरही बंदी..

0 3

MHLive24 टीम, 28 जून 2021 :- कोरोना विषाणू ने जगभरात थैमान घातले आहे. आता तिसर्‍या व चौथ्या लाटेचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. यासाठी विविध निर्बंध लावण्यात येत आहे. थायलंड ची राजधानी बँकॉक शहरामध्ये घरात एकत्र जेवण्यावरहीबंदी घातली आहे.

वीसहून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे निर्बंध यात घालण्यात आले आहेत. बांधकाम सुरू असलेली ठिकाणे बंद करण्यास सांगण्यात आले असून बँकॉक व इतर नऊ प्रांतात कामगारांच्या वसाहती बंद करण्यात आल्या आहेत. हे निर्बंध तीस दिवस लागू राहणार आहेत.

Advertisement

थायलंडमध्ये ३९९५ रुग्ण सापडले असून २४ तासात ४२ बळी गेले आहेत. अलीकडेच रुग्णांची संख्या दुप्पट झाली असून स्थलांतरित कामगार सहकार्य करीत नसलेल्या बांधकामांच्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. स्थलांतरित कामगारांच्या वसाहती बंद करण्यात आल्या असल्याचे कोविड १९ परिस्थिती हाताळणाऱ्या केंद्राचे प्रवक्ते अपिसामाई श्रीरंगसन यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या, सांकुत साखो प्रांतात रुग्णांची संख्या जास्त आहे. हे ठिकाण बँकॉकच्या दक्षिणेला आहे. राजधानी क्षेत्रात त्याचा समावेश नाही. बँकॉक मध्ये गंभीर रुग्णांना ठेवण्यासाठीच्या खाटा अपुऱ्या पडत असून काही तात्पुरती रुग्णालये तयार करण्यात आली आहेत.

Advertisement

पंतप्रधान प्रयुथ चॅन ओचा यांनी सांगितले,की सात दिवसांची संचारबंदी बँकॉकमध्ये लागू करण्याचा प्रस्ताव तूर्त मान्य करण्यात आलेला नाही. नवीन निर्बंधानुसार बांधकाम कामगारांना वेगळे काढले जाणार आहे.

ही कारवाई बँकॉक व इतर पाच प्रांतात केली जाणार असून दक्षिणेकडील चार राज्यात विषाणूचे प्रमाण जास्त असल्याने तेथे ही कारवाई केली जाणार आहे. बँकॉकमध्ये सर्व व्यवहार सकाळी नऊ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. मद्य विक्री सुरू राहणार असून त्यासाठी केवळ पार्सल सेवा दिली जाईल.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit