Free LPG Cylinder
Free LPG Cylinder

MHLive24 टीम, 30 मार्च 2022 :- Free LPG Cylinder : नुकतेच उत्तर प्रदेश आणि पंजाबसह देशातील पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. निडणुकीपूर्वी सगळ्या पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा केल्या होत्या. काही प्रमाणात मतदारांनीही त्याला प्रतिसाद दिला. निवडणुकीत भाजपसह अनेक पक्षांनी मोफत वीज, मोफत गॅस सिलिंडर अशा घोषणा केल्या होत्या.

आता पाचही राज्यांत सरकारे स्थापन झाली आहेत. भारतीय जनता पक्षाने (भाजप) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये स्वतःचे सरकार स्थापन केले आहे. भाजपने आता आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. या दिशेने गोव्याच्या प्रमोद सावंत सरकारने नवी घोषणा केली आहे. निवडणुकीतील आश्वासने ते पूर्ण करत आहेत. राज्यात राहणाऱ्या लोकांना ते 3 एलपीजी सिलिंडर मोफत देणार आहेत.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रमोद सावंत यांनी 28 मार्च रोजी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व व्हीआयपी पाहुणे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि मणिपूरचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रमुख जेपी नड्डा, इतर केंद्रीय मंत्री आणि किमान आठ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

गोव्यातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणार आहे

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, त्यांच्या पक्षाने आपल्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो पूर्ण करू. ते गोव्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जातील आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करतील.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup