Flipkart’s SastaSundar business: फ्लिपकार्टने लॉन्च केला नवीन ‘SastaSundar’ बिजनेस, होणार धमाका…

MHLive24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. अनेक ई-कॉमर्स कंपन्या आहेत कि ज्याद्वारे लोक शॉपिंग करतात. यात ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट हि सध्या टॉपवर आहे. आता फ्लिपकार्ट एका नवीन व्यवसायात पाऊल ठेवणार आहे.(Flipkart’s SastaSundar business)

फ्लिपकार्टने अलीकडेच ऑनलाइन फार्मसी SastaSundar.com विकत घेतली आहे आणि आता नवीन व्यवसाय, Flipkart Health+ ची घोषणा केली आहे. एक विशेष आरोग्य सेवा, यामुळे आता वापरकर्ते त्यांच्या घरबसल्या आरामात औषधे ऑर्डर करू शकतील आणि आरोग्य सेवेची पूर्ण काळजी घेऊ शकतील.

Flipkart Health+ हे काम करेल

Advertisement

फ्लिपकार्टच्या या प्रोग्राम मध्ये, सर्वप्रथम एक ई-फार्मसी सुरू केली जाईल, ज्यामुळे वापरकर्ते घरी बसल्या फ्लिपकार्टवरून त्यांची औषधे मागवू शकतील. औषधांसोबत, तुम्हाला वैयक्तिक समुपदेशन, सल्लामसलत आणि डायग्नोस्टिक्स ची सेवा देखील दिली जाईल.

काय आहे SastaSundar.com 

SastaSundar.com हे भारतातील एक सुप्रसिद्ध डिजिटल हेल्थकेअर आणि फार्मसी प्लॅटफॉर्म आहे, ज्याला देशभरातील 490 पेक्षा जास्त फार्मसीचा पाठिंबा मिळाला आहे. ही फार्मसी अधिकृत स्त्रोतांकडून औषधे घेते आणि लोकांच्या घरी वेळेवर पोहोचवते. आता हे प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने विकत घेतले आहे आणि ते फार्मसी सेवेसाठी या प्लॅटफॉर्मची मदत घेणार आहेत.

Advertisement

या नवीन व्यवसायामागील काय आहे कारण

फ्लिपकार्टशी बोलले असता त्यांनी सांगितले की, फ्लिपकार्ट हेल्थ+ हा नवीन व्यवसाय सुरू करण्यामागील कारण म्हणजे लोकांपर्यंत औषधे आणि आरोग्यसेवा वेळेवर पोहोचवणे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी आतापर्यंत इतर सर्व प्रकारच्या वस्तू त्यांच्या वापरकर्त्यांना विकल्या आहेत आणि आता ते हे क्षेत्र देखील कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अॅमेझॉनने गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये अॅमेझॉन फार्मसी सुरू केली होती आणि टाटा डिजिटल देखील हे काम करते. अशा परिस्थितीत फ्लिपकार्टचा या क्षेत्रात प्रवेश करणे म्हणजे त्या सर्व प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करणे होय.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker